pm muft bijli yojana| मोदी सरकारचा मोठा निर्णय; मिळणार मोफत वीज, यांना मिळणार याचा लाभ
केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’तून वीज मिळणार आहे. या योजनेत 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. देशातील एक कोटी लोकांना मोफत वीज देण्यासाठी pm muft bijli yojana मोदी सरकार 75,021 कोटी रुपये खर्च करणार आहे.
Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी नागरिकांना मोफत वीज muft bijli yojana देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केला आहे. ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ (pm muft bijli yojana) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. देशातील एक कोटी लोकांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकार 75,021 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली
Ajit Pawar |अजित पवार भडकले; मस्ती आली आहे का?
pm muft bijli yojana| मोदी सरकारचा मोठा निर्णय
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, छतावर सौरऊर्जा संयंत्रे (रूफ टॉप सोलर) बसवण्याची ही योजना आहे. या योजनेसाठी एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लँटसाठी 30,000 रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लँटसाठी 60,000 रुपये अनुदान मिळेल. 3 किलोवॅटसाठी 78000 रुपये अनुदान मिळणार आहे. ज्यांनी आपल्या घरावर सौरउर्जा संयंत्रे लावली आहेत, त्यांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज Mofat Bijli Yojana मिळणार आहे.
Table of Contents
कमी व्याजदरात कर्ज
रूफ टॉप सोलर बसवण्यासाठी कमी व्याजात कर्ज मिळणार आहे. रेपो रेटपेक्षा फक्त 0.5 % जास्त व्याज त्यासाठी द्यावा लागणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 500 किलोवॅटसाठी 18000 प्रती किलोवॅट अनुदान देण्यात येणार आहे. Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती.
pm muft bijli yojana असा करा अर्ज
योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmsuryaghar.gov.in वर जाऊन अप्लाई फॉर रूफटॉप सोलर पर्याय निवडा.
तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीच्या नावाची निवड करा. त्यानंतर आपला ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ई मेल टाक
नवीन पानावर ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून लॉगीन करा. त्यानंतर समोर फार्म येईल. तो पूर्ण भरा आणि सबिमिट करा.
या प्रक्रियेनंतर तुम्हाला फिजिबिलिटी अप्रूव्हल मिळेल. त्यानंतर DISCOM मध्ये नोंदणी असलेल्या कोणत्याही वेंडरकरुन प्लॅन्ट इंस्टॉल करता येईल.
सोलर पॅनल इंस्टॉलेशन तुम्हाला प्लँट डिटेल देऊन नेट मीटरसाठी अर्ज करावा लागले.