भारतीय शेअर बाजारात share market today मोठी घसरण झाली आहे, सेन्सेक्स 4000 आणि निफ्टी 5000 पेक्षा जास्त कोसळले आहेत. ट्रम्पच्या टॅरिफ, जागतिक आर्थिक मंदीची भीती आणि FII ची विक्री ही प्रमुख कारणे आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्सवर मोठा परिणाम झाला आहे.

share market today| शेअर बाजारात 19 लाख कोटी बुडाले
भारतीय शेअर मार्केटमध्ये share market today पुन्हा मोठा महाभूकंप आला आहे. या भूकंपामुळे गुंतवणूकदारांची झोपच उडाली आहे. जगभरात सुरू असलेल्या ट्रेड वॉरची भीती आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात हाहा:कार उडाला आहे. भारतीय शेअर बाजारातील दिवसाची सुरुवातच सेन्सेक्स 4000 अंकाने कोसळून झाली तर निफ्टी 50 21,750 अंकाच्या खाली गेला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये 10 टक्क्याची घसरण झाली आहे. इंडिया VIX 52 टक्क्यावर जाऊन 21 टक्क्यावर आला आहे. बाजारातील पडझडीचे मुख्य पाच कारणे आहेत. त्याचाच घेतलेला हा आढावा.

जागतिक बाजारपेठेतील विक्री
अमेरिका, आशिया आणि यूरोपच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जापानमध्ये शेअर बाजार 9 टक्क्यांनी कोसळला आहे. तैवानचा बाजार 10 टक्क्याने कोसळला आहे. या शिवाय अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी मोटी विक्री झाली. Dow Jones 5.5 टक्के कोसळला, S&P 500 मध्ये 5.97 टक्के घसरण होती. तर, Nasdaq 5.73 टक्के कोसळताना दिसला. त्यामुळे बाजाराचा नूरच बदलला आणि विक्री दिसून आली.
Table of Contents
टॅरिफचा परिणाम
ट्रम्प प्रशासनाने 180 हून अधिक देशांवर एकाचवेळी टॅरिफ लागू केले. त्याचा परिणामही बाजारावर दिसून आला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदार धस्तावले आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अजून मोठी घसरण पाहायला मिळू शकते.
मार्केट दीड वर्षात रुळावर?
दरम्यान, शेअर बाजारातील share market today पडझडीवर अर्थतज्ज्ञ विशाखा बाग यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला आहे. ट्रम्प टॅरिफ हे मार्केट पडण्याचं मुख्य कारण आहे. जागतिक बाजार पेठेतील टॅक्सेशनचा हा परिणाम आहे. मार्केटची ही सेंटिमेंटल प्रतिक्रिया आहे. इम्पोर्ट ड्युटी भारतावर लावल्यामुळे देखील त्याचे परिणाम मार्केटवर झाले आहेत. इतर देशांतून कमीत कमी इम्पोर्ट व्हावे यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. हे व्हर्चुअल खाली पडलेले मार्केट आहे. जसे 2008 नंतर, कोरोना नंतर मार्केटवर आले तसे हे मार्केट देखीलवर येईल. येत्या एक ते दीड वर्षात मार्केट पुन्हावर येईल. एसआयपी सुरूच ठेवली पाहिजे. तसेच मोठ्या कंपन्यांचे स्टॉक घेऊन ठेवायला हवेत. सोन्याचे भाव आणि स्टॉक मार्केट देखील येत्या दिवसात वाढणार आहे, असं विशाखा बाग यांनी म्हटलं आहे