महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची ssc result 2025 लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण 12 वीच्या निकालानंतर आता लवकरच 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आता या महिन्यात जाहीर होणार आहे. कधी लागणार निकाल, कोणत्या साईटवर पाहणार, हे जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी वाचा.
todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव
10 वीचा निकाल कधी ?
कोणतीही परीक्षा दिल्यानंतर त्याचा निकाल कधी लागणार याची प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्सुकता वाटते. आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या 12 वीचा निकाल नुकताच लागला, त्याच पाठोपाठ आता इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकताही ताणली गेली आहे. यंदा लाखो विद्यार्थ्यांनी 10 वीची परीक्षा दिली, त्याचा निकाल कधी लागणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून SSC अर्थात इयत्ता 10 वीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

ssc result 2025 10 वीचा निकाल या दिवशी लागणार
मात्र त्या निकालाची नेमकी तारीख आणि वेळ अद्याप अधिकृत रित्या जाहीर झालेली नाही. १५ मे २०२५ रोजी दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे . रोजी पण लवकरच त्या संदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते. हा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर 10 वीची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्सवर आपला निकाल चेक करू शकतात.
12 वी प्रमाणेच इयत्ता 10वीचे ssc result 2025 निकालही आधी सकाळी प्रेस कॉन्फरन्सद्वारे जाहीर करण्यात येतील, त्यावेळी या वर्षीच्या परीक्षेशी संबंधित महत्त्वाचे तपशील शेअर केले जातील. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, विद्यार्थ्यांची संख्या, विभागवार निकाल इत्यादींचा समावेश त्यामध्ये असेल. यावर्षी दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली आणि 17 मार्च रोजी संपली. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. पहिल्या शिफ्टमध्ये ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत तर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत ही परीक्षा पार पडली.

कसा पहाल रिझल्ट ?
सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.
आता सबमिट वर क्लिक करा आणि तुमचा निकाल दिसेल.
तुमचा निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा.
भविष्यातील वापरासाठी याची एक हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
2024 साली कसा लागला होता 10 वीचा रिझल्ट ?
गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता. त्यावेळी एकूण 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 15,49,326 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. तर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख 84 हजार 431 इतकी होती. म्हणजेच एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 95.81 टक्के होती. यामध्ये मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 97.21 टक्के आणि मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 94.56 टक्के होता. कोकण विभागाने 99.01 टक्के निकालासह सर्वाधिक कामगिरी केली, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी, 94.73 टक्के इतका होता.
Table of Contents
12 वीचे निकाल जाहीर
गेल्या आठवड्यात म्हणजेच 5 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून इयत्ता 12 वीचे निकाल जाहीर करण्यात आले होते. या वर्षी 12वीचे एकूण 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि मुलींनी दरवेळीप्रमाणेयंदाही निकालात बाजी मारली. उत्तीर्ण होण्याऱ्या मुलींची एकूण टक्केवारी 94.58 टक्के इतकी होती तर मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 89.51 टक्के होता.