Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Solapur | सोलापुरमधील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू
ब्रेकींग न्यूज

Solapur | सोलापुरमधील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

mahalokwaniBy mahalokwaniMay 18, 2025Updated:May 18, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोलापुर Solapur शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. सोलापूरमधील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3 च्या सुमारास आग लागली आणि पाहता पाहता या आगीने अतिशय रौद्ररूप धारण केलं आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

Solapur | सोलापुरमधील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 जणांना कारखान्यातून बाहेर काढलं आहे. या आगीत तिघांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आणखीही पाच ते सहा जण आग लागलेल्या या कारखान्याच्या आतच अडकून पडले आहेत. त्यांच्यापैकीही काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीतून बाहेर काढलेल्या तिघांची अवस्था अजून गंभीर असून त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आग लागून अनेक तास उलटून गेल्यानंतरही ही आग विझलेली नाही. कारखान्यात आणखी पाच ते सहा कामगार अडकून पडले आहेत. टनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली असून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

दरम्यान आग लागलेल्या या कारखान्यात टॉवेल तयार केले जायचे. त्या साहित्यामुळे आग आणखीनच पसरत गेली असून प्रचंड नुकसान झाल्याचे समजते. आगीमध्ये कारखान्यातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे.

Table of Contents

  • Solapur | सोलापुरमधील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग

रात्री लागलेली ही आग इतकी भीषण होती की, मध्यरात्री संपूर्ण परिसर आगीच्या ज्वालांनी वेढला गेला होता. अगदी दूरवरूनही आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या. इतक्या तासांनंतरही या आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेलं नाही. अग्निशमन दलाकडून कारखान्यातील तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlessc result 2025| 10 वीचा निकाल या दिवशी लागणार; रिझल्ट, कुठे चेक कराल ? जाणून घ्या एका क्लिकवर
Next Article mahanagar palika election | सर्वच राजकीय पक्षांची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; चुरस वाढणार
mahalokwani
  • Website

Related Posts

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

March 30, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.