जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
Tree Planting| मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन
आज रोजी जामखेड शहरातील जमादार वाडी येथे मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष बबन काशिद (उपमहाराष्ट्र केसरी) यांनी वृक्षारोपण Tree Planting कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी ११.०० वाजता पुणे येथील मित्र परिवार तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर उपस्थित होते.

यावेळी बबन काशिद (उपमहाराष्ट्र केसरी) यांचे पुण्यातील मित्र परिवार मोठ्या संख्येने या वृक्षरोपणाच्या Tree Plantingकार्यकर्मासाठीउपस्थित होते, या मित्रांचे मल्ल विद्यावर असणारे प्रेम आणि बबन काशिद यांना मानणारे अनेक मंडळी वृक्षारोपण साठी उपस्थित होते, यावेळी त्यांनी स्वतः खड्डे घेऊन हे झाडे लावण्यात आले आहे
Flipkart Sale। फ्लिपकार्टवर बंपर सेल ऑफर; या तारखेपासून महाबचत सेलला सुरवात..
Table of Contents
या वृक्षारोपणच्या Tree Planting कार्यक्रमाप्रसंगी उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद बोलताना म्हटले कि , ग्रामीण भागातील युवकांमध्ये जिद्द आणि चिकाटी मोठ्या प्रमाणात असते , आणि त्याच जोरावर पुढे जाऊन हे युवक यशस्वी बनत असतात, फक्त त्यांना योग्य काळात योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते, यासाठी आम्ही लवकरच जामखेड तालुक्यातील अनेक गावामध्ये आमच्या मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन मार्फत अकॅडमी स्थापन करणार आहोत, यामध्ये मल्ल विद्या, बाल संस्कार, पोलीस भरती , सैन्य भरती, अशा विविध प्रकारचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले

वृक्षारोपणच्या Tree Planting कार्यक्रमासाठी खास पुण्यावरून आलेले उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद यांचे मित्र यांनी सर्वानी बबन काशिद यांचे चालू केलेल्या या उपक्रमाचे कौतूक केले आहे, यासाठी आम्ही सर्व जण बबन काशिद यांच्या सोबत आहोत

यावेळी घनश्याम भोसले ( सेवा निवृत्त,वन अधिकारी कोल्हापूर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा मधुकर राळेभात,माजी सभापती सुर्यकांत मोरे,कॅप्टन लक्ष्मण भोरे, राजीव आगाशे, मधुकर शिरुदे, रमेश मोडक, सुदर्शन नाटू, प्रविण जोशी, केसकर, प्रशांत कुलकर्णी, दिलिप देशपांडे, नारायण घरे, कानेटकर, सिन्नरकर, देशपांडे, अविनाश शहाणे, डॉ.पाषणकर, मारुती, मनोज रेणुशे, भाऊसाहेब तनपुरे, विकास तनपुरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.