महालोकवाणी न्यूज:
राज्यात अवकाळी पावसाचा कहर कालपासून सुरु झालाय. हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला धास हिरावून घेणारा असाच आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस कधी जाणार? असा प्रश्न अनेकांना सतावतोय. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढचे तीन दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे.

एक द्रोणीय स्थिती द. कोकण ते मध्य छत्तीसगड पर्यंत आहे. त्या प्रभावाखाली 6-9 मार्च काळात महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. 6-7 मार्चला गुजरात व मध्य महाराष्ट्रात, तर 7 मार्चला मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात तर खोरी टिटाने भागात गारपीट पडल्याची माहिती मिळत आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्येही पाऊस पडल्याची माहिती मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. या अवकाळी पावसाचं नुकसान पाहता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय त्यांनी या नुकसान भरपाईची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना पंचनामा करुन नुकसान भरपाईबद्दलचे आदेश दिले आहेत

विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर, कांदा, तसेच मोसंबी व डाळिंब आदी फळबागांचेही नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेती व शेतकऱ्यांवर पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस
विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात काही काळासाठी गारवा आला. पण या पावसामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय.
अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले असून नागपूरसह, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील फळबागांनाही याचा मोठा फटका बसला असून द्राक्ष, डाळिंब या फळबागांनाही मोठा फटका आहे. या गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर, कांदा, तसेच मोसंबी, संत्रा व डाळिंब आदी फळबागांचेही नुकसान झाले. या गारपिटीसह पडलेल्या पावसाने तूर व कांदा या दोन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वेचणीला आलेला कापूस ओला झाल्यामुळे शेतकर्याची चिंता वाढली आहे. उशिराच्या कापूस विक्रीवरही या पावसाचा मोठा परिणाम होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
संत्रा, कांदा पिकाला मोठा धोका
गारपिटीने संत्र्याचा बहार हातातून जाण्याची शक्यता आहे. तूर, हरभरा, कांद्यालाही गारपिटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. फुलोर्यावर असलेल्या तूर आणि हरभरर्याचं पावसानं नुकसान होणार आहे. आणखी दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
