Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केली स्थापना !

अहमदनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केली स्थापना !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. जयंती उत्सवानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत जयंती उत्सव समितीची स्थापना करुन जयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकप्रसंगी अक्षय बोरुडे, तेजस गायकवाड, शोभाताई गाडे, स्वप्निल भिंगारदिवे, मिरा गवळी, महेमुदा पठाण, रेखा डोळस, हिरा भिंगारदिवे, संगीता बार्वेकर, रेखा साळवे, रंजना भिंगारदिवे, सुनिता भिंगारदिवे, राधा पाटोळे, अबूबखर शेख, अमोल आडबले, शहबाज शेख, आय्युब शेख, सिद्धार्थ राजगुरू, रामभाऊ आजबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सोमा शिंदे, उपाध्यक्षपदी विशाल गायकवाड, कार्याध्यक्षपदी किरण जाधव, सचिवपदी गौतमीताई भिंगारदिवे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अल्पसंख्याक आघाडी चा युवक शहराध्यक्षपदी शाहीद शेख यांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 1 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान साजरी होत आहे. 1 एप्रिलला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्हा रुग्णालयात फळ वाटप करुन जयंती उत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रारंभ होणार आहे. तसेच शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. विशेष आकर्षण म्हणून यामध्ये बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर देखावा साकारण्याचे बैठकीत नियोजन करण्यात आले.


या जयंती उत्सव सोहळ्यासाठी प्रा. जयंत गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव,
उद्योजक लॉरेन्स भैय्या स्वामी, नितीन कसबेकर, सुनील क्षेत्रे ,महेश भोसले, किरण गायकवाड, सुरेश भिंगारदिवे. यांचे मार्गदर्शन लाभत आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न..! कोणी केला वाचा सविस्तर
Next Article Oneplus Mobile वर मिळत आहे बंपर डिस्काउंट; ऑनलाईन सेल चालू
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.