
नेप्ती अहमदनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील 40 विद्यार्थ्यांची विविध मल्टिनॅशनल , नॅशनल कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने अग्रगण्य टीसीएस, याझकी इंडिया, वरफुल इंडिया , सेको इंडिया , क्रॉम्प्टन ग्रीव्हज , स्नाईडर इलेक्ट्रिकल्स इत्यादी कंपन्यांचा समावेश होतो अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय आर खर्डे यांनी दिली.
या निवडी मध्ये संगणक विभागातील अयाची फॉर्म मध्ये निवड झाली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक पॅकेजेस 4-7 लाखांच्या दरम्यान आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शुभम मराठे , निमसे दत्तात्रेय , वाणी दीपक, रिजवान बागवान, सोमेश अकोलकर, गोरे शेखर, कडू संकेत, मोहोळकर ईश्वर, भांडे यशवंत, काटकर विवेक, अभिषेक आवारे, जंगली शुभम, कसार सुप्रिया, गाढवे योगेश, सूर्यवंशी निलेश, वामन सुनील अनिकेत आढाव, दसपुते जगदीश, शिंदे गणेश, निलेश सूर्यवंशी, विद्यार्थ्यांचा समावेश होतो
या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे पाटील, सचिव माननीय श्री जी डी खानदेशी, सहसचिव माननीय श्री विश्वासराव आठरे , खजिनदार माननीय श्री विवेक भापकर व सर्व संस्था विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. वरील मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवडी करता महाविद्यालयांमध्ये सुसज्ज असणारा ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग हा अंतिम अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असतो त्यामध्ये प्रामुख्याने कंपनी करता लागणाऱ्या स्किल्स चा समावेश होतो. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विभाग प्रमुख प्रा प्रा ए बी काळेमहाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. एस एम वाळके प्रा. जी एस साळुंके हे कार्यरत असून महाविद्यालयातील 100% प्लेसमेंट साठी प्रयत्न शीलआहेत.

वामन सुनील विद्यार्थी
मी नगर तालुक्यातील देवगाव येथील असून छत्रपती अभियांत्रिकी महादलीत ऍडमिशन घेतल्यापासून मला कंपनी विषयक माहिती तयारी कशी करावी याच्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शक महाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाकडून मिळाले. विभाग प्रमुख काळे सरांनी आम्हाला प्रेरणा दिली. आणि त्यामुळेच माझे शिक्षण संपण्यापूर्वीच कंपनीमध्ये प्लेसमेंट झाली आहे.

मनोगत- ईश्वर मोहोळकर विद्यार्थी
छत्रपती अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतेवेळी थोडासा गोंधळलो होतो परंतु मेकॅनिकल विभागामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे आणि त्याकरिता आपल्याकडे प्लॅन काय आहे याचा विचार मी केला आणि त्याबरोबरच विभागातील विविध शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन व वेळोवेळी सहाय्यता केली आणि त्यामुळेच आज माझी कंपनी मध्ये सिलेक्शन होऊ शकले.

सोमेश अकोलकर – विद्यार्थी
मी पुणे जिल्ह्यातला असून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकताना कंपन्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या गर्जा व त्याकरिता महाविद्यालयांनी वेळोवेळी केलेली शिस्तबद्ध आखणी यामध्ये मी महाविद्यालयाचा व विभागाचा अतिशय आभारी आहे. मेकॅनिकल विभागाने घेतलेल्या पूर्वतयारी मुळे माझी मल्टिनॅशनल कंपनी मध्ये निवड झाली
मनोगत – प्राचार्य डॉ वायर खर्डे
औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळlकडे काही विशेष कौशल्य असल्याशिवाय त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत नाही त्याकरिता छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये विद्यार्थी अधिकाधिक कौशल्य आत्मसात कसे करता येतील याकरिता आम्ही कायम प्रयत्नशील असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण करण्याकरता हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असताना याचा विशेष आनंद होत आहे.
