Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर सह इतर दोन ठिकाणी दगडफेक, वाहने जाळली; दोन गटात प्रचंड राडा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

अहमदनगर सह इतर दोन ठिकाणी दगडफेक, वाहने जाळली; दोन गटात प्रचंड राडा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

mahalokwaniBy mahalokwaniApril 5, 2023Updated:April 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नंदूरबार आणि अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. दोन्ही गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

नगरमध्ये किरकोळ वादातून राडा

अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. काल रात्री हा प्रकार घडला. छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगर येथे ही घटना घडली. या दगडफेकीत चार ते पाचजण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांव नगर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दगडफेकीत दोन मोटरसायकलसह एका स्विफ्ट कारच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 10 ते 12 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका

नगरच्या छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगरमध्ये दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असतानाच मुकुंद नगर परिसरात देखील दगडफेक झाली. त्यामुळे शहरातील या संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरातील वातावरण सध्या निवळलं आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलीसा कडून सांगण्यात आले आहे

सोशल मीडियावर वॉच

नंदूरबारमधील दोन गटातील हाणामारी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 ते 16 जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सायबर सेल सोशल मीडियावर वॉच ठेवून आहे. सोशल मीडियावरून कोणत्याही अफवा पसरू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. मात्र, सध्या नंदूरबारमधील तणाव निवळला असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड भिम जयंती उत्सव समितिच्या अध्यक्ष पदी राजन समिंदर सर यांची निवड झाल्याबद्दल ; जामखेड तालुका कर्मचारी कृती समिति च्या वतीने सत्कार.!
Next Article तुमचेही लहान मुलं शाळेत जातात ना; पण तिथे त्यांना अशी वागणूक तर मिळत नाही ना VIDEO पाहून येईल संताप.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.