दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर त्या आधी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन्ही गटाला 9-9 जागा मिळाल्या होत्या त्यामुळे जामखेड कर कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता पणाला लावली होती आज जामखेड करांनीही कर्जतची पर्नरावृती केली आहे आमदार रोहित पवार गटाला 9 तर आमदार प्रा. राम शिंदे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक असा निकाल कर्जतजामखेड बाजार समितीत लागला आहे.
पण निकाल लागल्यानंतर दोन्ही मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे, खरच 9-9 चा योगायोग आहे, की दोन्ही आमदारांमध्ये आधीच जागे संदर्भात वाटाघाटी तर झाल्या नसतील ना, का दोघांनी आधीच काही प्रि- प्लॅन केला होता, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
जामखेड चा सविस्तरपणे निकाल
राष्ट्रवादी विजयी 9 उमेदवार
1)सुधीर राळेभात
2)कैलास वराट
3)अंकुश ढवळे
4)सतिश शिंदे
5) नारायण जायभाय
6)रतन चव्हाण – (महीला राखीव)
7)अनिता शिंदे- (महीला राखीव)
8)सुरेश पवार – (व्यापारी)
9)राहुल बेदमुथ्था (व्यापारी)
——————————–
भाजप विजयी 9 उमेदवार
1)गौतम उतेकर
2)सचिन घुमरे
3)विष्णू भोंडवे
4)गणेश जगताप
5)शरद कार्ले (ग्रामपंचायत)
6) वैजनाथ पाटील (ग्रामपंचायत)
7)नंदकुमार गोरे (ग्रामपंचायत)
8)डॉ. सिताराम ससाणे (ग्रामपंचायत)
9) बबबन उर्फ रविंद्र हुलगुंडे( हमाल)
