जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार
जामखेड पोलीस स्टेशन येथे दिनांक-24/06/2023 रोजी मस्जिद चे सर्व मौलाना, बकरी ईद साजरे करणारे कुरेशी लोक यांची बकरी ईद व आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मीटिंग घेण्यात आली आहे.

आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सन साजरे करा असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे,
या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे
1) बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी आल्याने उघड्यावर कुरबानी करू नये.
2)बकरे कापल्यानंतर त्यांची वेस्टेज हे उघड्यावर तसेच रस्त्याच्या कडेला न फेकता ते खड्डा करून झाकून टाकावे.
3) कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
4) सध्या सोशल मीडिया वापरत असताना आपण कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपहार्य मेसेज कोणाला पाठवू नये.
या अनुषंगाने मौलाना खलील यांनी सांगितले की, आम्ही आषाढी एकादशी दिवशी बकऱ्यांची कुर्बानी न देता ती दुसऱ्या दिवशी देऊ असे सांगितले आहे त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी होणार नाही असा निर्णय सर्वानुमते झाला आहे.
जामखेड पोलीस निरीक्षक मा.महेश पाटील यावेळी बोलतांना म्हटले की, मुस्लिम समाजाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे जातीय सलोखा राखला जाईल, हिंदू – मुस्लिम भाईचारा अधिक बळकट होईल. आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण आनंदाने साजरे होतील.
वरील सर्व सूचना त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या आहेत. मिटींगला मौलाना , कुरेशी लोक ,व इतर लोक हजर होते.
