पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे
कोंडीराम सदाशिव क्षीरसागर माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, भिगवण मध्ये ब्युटी पार्लर कोर्स प्रशिक्षण निःशुल्क सुरू करण्यात आले आहे… इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व विभागातील सर्व विद्यार्थिनींसाठी हा कोर्स ( प्रशिक्षण ) उपलब्ध करण्यात आला असून या कोर्सच्या माध्यमातून सर्व गरजू व उत्साही असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी याचा फायदा होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अजित क्षीरसागर, महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय तुषार क्षीरसागर सर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अविनाश गायकवाड, ज्यूनियर विभाग प्रमुख प्रा. नवनाथ सावंत यांनी आपल्या मनोगतातून ब्युटी पार्लर कोर्स चे महत्व व आजची काळाची गरज याविषयी विद्यार्थिनींना जागृत केले..
सदर प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या घाडगे, ब्युटी पार्लर कोर्सच्या समन्वयक सौ. पद्मिनी गायकवाड, प्रिया मोरे तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होत्या..
