Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » उघडा डोळे बघा नीट जामखेड महावितरणचा भोंगळ कारभार .!

उघडा डोळे बघा नीट जामखेड महावितरणचा भोंगळ कारभार .!

mahalokwaniBy mahalokwaniJune 18, 2023Updated:June 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड। धनराज पवार

जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील अगदी मुख्य रस्त्यावरील उघडी डीपी दुर्घटनेला निमंत्रण देत आहे. वारंवार तक्रार देऊनही कुणीच दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

#mscbjamkhed#mahalokwaninews#mahalokwanifollup pic.twitter.com/AbT4Jnqj4M

— Mahalokwani (@mahalokwani) June 18, 2023

डीपीची जागा बदलण्याची गरज नाही; मात्र सुरक्षित आणि योग्य उपाययोजना केली जावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. आहुजा निवास समोरील ट्रान्सफार्मर (डिपी मुख्य मार्गावरच अगदी रस्त्यावर ही डीपी आहे. वरच्या भागात ट्रान्सफार्मर आणि यावरून मुख्य वीजवाहिनी आहे. मुख्य डीपी पुरती मोडकळीस आली आहे. पूर्वी ही यंत्रणा रस्त्याच्या कडेला होती. आता सिमेंट रस्ता तयार झाल्याने डीपी अगदी रस्त्यावर आली आहे. सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली जात नाही. जनावरांचा नेहमीच वावर असतो. त्यांना कधीही धोका संभवू शकतो. वस्तीतील मंडळींना बाहेर पडण्यासाठी हाच मार्ग आहे.

बच्चे कंपनी रस्त्याच्या कडेला खेळत असते. तसेच फिरण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांना याच डीपीपासून जावे लागते. एखादवेळी दुर्लक्ष झाल्यास मुले डीपीकडे जाण्याचा धोका असतो. लहान मुले नियमित येत असतात. पादचाऱ्यांनाही अगदी डीपीजवळून जावे लागते. यामुळे आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी केल्या. पण, कुणीही दाद देत नाही. जबाबदारी ढकलण्याचाच प्रयत्न केला जातो. या प्रकाराने नागरिक संतप्त असून प्रशासन दुर्घटनेची वाट बघत आहे काय?, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.स्थानिक रहिवाशांकडून धोकादायक स्थितीबाबत वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. पण, कुठूनच दाद मिळत नाही.

सुदैवाने अद्याप दुर्घटना घडली नसली तरी धोका कायम आहे. उलटपक्षी वीज यंत्रणा रस्त्यावर आल्यापासून धोका अधिकच वाढला आहे. दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण?, एवढेतरी संबंधित यंत्रणेने स्पष्ट करावे.

गुलशन आहुजा (नागरिक) प्रतिक्रिया:

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. रहिवाशांनी या समस्या अनेकवेळा मांडल्या आहेत परंतु,महावितरणकडून उघड्या डीपी व लोंबकळणाऱ्या वायरची समस्या मार्गी लागत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच यात लक्ष यावे, जेणेकरून ही समस्या मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (१८ जून) रोजी गहिनाथ गडावरून पंढरपुर कडे प्रस्थान.!
Next Article JEE Advanced 2023 परिक्षेत श्री सांदिपणी अँकॅडमीचा डंका –
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.