Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणा बरोबर सर्व सुविधा देऊ- खा.डाॅ.सुजय विखे पाटील

ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणा बरोबर सर्व सुविधा देऊ- खा.डाॅ.सुजय विखे पाटील

mahalokwaniBy mahalokwaniMarch 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यात ऊसतोड कामगार हे मोठ्याप्रमाणात आहेत, ह्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे असे स्वप्न स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे, स्व.बाळासाहेब विखे पाटील, स्व.राजीव राजळे यांचे होते, हे स्वप्न आपण आता पूर्ण करणार आहोत.या मुलांना चांगल्या शिक्षणा बरोबरच त्यांचे संगोपन देखील चांगले झाले पाहिजे यासाठी पुढील काळात सातत्यपूर्ण काम करणार असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून लवकरच पाथर्डी तालुक्यात सीबीएससीची निवासी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय स्थापन करणार असल्याचे जाहीर केले.

धनगरवाडी येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी असलेली योजना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना तसेच विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आ.मोनिका राजळे ह्या होत्या.


यावेळी बोलतांना ते म्हणाले की मागील तीन वर्षांत जे आघाडीचे सरकार होते.ते केवळ ठेकेदारीची काम करत होते.आधिकारयाच्या दालनात वाळू माफीया, नंबर दोनचे काम करणारे दलाल हेच असायचे आणि आमचा सर्वसामान्य नागरिक मात्र हा तासनतास वाट बघत बाहेर थांबायचा. आता हे सगळं बंद केले असून सर्वसामान्याचे हे सरकार आहे. त्यामुळे त्याच्या कामासाठी ना दलालाची गरज ना चकरा मारण्याची गरज, सरकार आता तुमच्या दारात येऊन तुम्हाला लागणारे सर्व आवश्यक ते कागदपत्रे तुम्हाला घरपोहोच देणार आहोत,असे खा.विखे यांनी सांगितले.


आताचे शिंदे-फडणवीस सरकार आणि या सरकार मधील नंबर दोन असे महत्वाचे खाते असलेले आपले लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे गोरगरीबासाठीच काम करत आहेत. याचा आपल्या जिल्ह्यासाठी विशेष लाभ होणार आहे. जिल्ह्यात जे काही रखडलेले प्रकल्प तसेच विकास कामे आहेत.ते पुढील वर्षांत पूर्ण करण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले आहे.
खा.विखे बोलताना असेही म्हणाले की जिल्ह्यात आम्ही सर्व एक आहोत , आमच्यात जमत नाही असा अपप्रचार विरोधक करत आहेत मात्र खरी गोष्ट ही वेगळीच आहे, जिल्हा बँक अध्यक्षाच्या निवडणुकीत हे आम्ही सिध्द करून दाखवले आहे. आमचे केवळ चार संचालक असताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे अध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले.आता तुम्हीच सांगा कोणा कोणाचे कोणा कोणा बरोबर जुळते, आम्ही भाजप एकसंघ आहोत.आणि आम्हा सर्वांचे एकच ध्येय आहे. ते म्हणजे आपला विकास, या साठी आपल्या सर्वांच्या खंबीर साथीची गरज आहे, आपण आमच्या पाठीशी असेच रहा हा विश्वास आम्हाला आहे.

या प्रसंगी अर्जुन शिरसाठ,अशोक चोरमुले,भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे पाटील, माणिकराव खेडकर, अभय काका आव्हाड कशिताई गोल्हार, राहुल राजळे, राहुल करखिले, प्रतीक खेडकर, बंडू बोरुडे,बबन सबलस, मंगल कोकाटे, भिमराव फुंदे,भगवान साठे, विष्णूपंत अकोलकर, गोकुळ दौंड, सचिन वायकर, सुनील ओहळ , बाबा राजगुरु,अशोक गाडे, मिठूभाऊ चितळे, भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleHeart attack| हार्ट अटॅक पासून स्वतःला वाचवा ..! नियमित चालण्याचा आपल्या शरीराला कसा होतो फायदा जाणून घ्या..
Next Article दौंड हादरले | प्रेम संबंध ठेवून लग्नाला नकार दिल्याने मुलीची आत्महत्याः एकावर गुन्हा दाखल
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.