Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कर्जतमध्ये महिला दिन उत्साहात साजरा, सौ. सुनंदाताई पवार यांच्या हस्ते; कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान बचत गटांना कर्जवाटप, आरोग्य तपासणी

कर्जतमध्ये महिला दिन उत्साहात साजरा, सौ. सुनंदाताई पवार यांच्या हस्ते; कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान बचत गटांना कर्जवाटप, आरोग्य तपासणी

mahalokwaniBy mahalokwaniMarch 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

कर्जत / जामखेड | जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तसंच महिला बचत गटांना व्यवसायासाठी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटपही करण्यात आले.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात नेहमीच विकासाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यामध्ये त्यांच्या मातोश्री आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांचे मोठे योगदान असते. कर्जतमध्ये नुकत्याच उभारलेल्या शारदाबाई पवार या भव्य सभागृहात ‘जागतिक महिला दिना’निमित्तही त्यांनी महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मतदारसंघातील वीर मातांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. शिवाय चांगला व्यवसाय करुन यशस्वी ठरलेल्या आदर्श महिला बचत गटांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. केवळ सन्मान करण्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता या निमित्ताने महिलांची आरोग्य तपासणीही यावेळी करण्यात आली. महिलेचे आरोग्य चांगले असेल तर ती आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राखील, या भावनेतून ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या माध्यमातून ही आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक महिलांनीही आपले मनोगत व्यक्त करुन इतर महिलांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाला कर्जत-जामखेड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या.

आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात महिला बचत गटांचे जाळे निर्माण केले असून या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रमच त्या निरंतर राबवत असतात. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाकडे पाहता येईल. केवळ बचत गट स्थापन करुन त्या थांबल्या नाहीत तर या बचत गटांना विविध व्यवसायासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठीही त्यांचा पुढाकार असतो. शिवाय तयार उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळवून दिली जाते. त्यांनी सुरु केलेली ‘भीमथडी जत्रा’ हे महिला सक्षमीकरणाचे एक अनोखे मॉडेल म्हणून राज्यात सर्वपरीचित आहे. त्यानुसार या कार्यक्रमात महिला बचत गटांना विविध व्यवसायासाठी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटप करुन खऱ्या अर्थाने ‘महिला दिन’ हा महिलांच्या प्रगतीशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांत महिला बचत गटांना व्यावसायिक कर्ज, बँक आणि पणन यांच्या माध्यमातून व्यवसायासाठी आणि मशिनरीसाठी ४.७२ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबोरीबेल (ता. दौंड) येथील रेल्वे भुयारी मार्गासाठी १० कोटींचा निधी मंजूर- आमदार अँड. राहुल कुल
Next Article राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेला परवानगी देऊ नये; या संघटनेने दिलं पोलीस महासंचालकांना पत्र !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.