Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कर्जत- जामखेड एमआयडीसीची अधिसूचना जाहीर करा; अन्यथा या दिवशी हजारोंच्या संख्येने उपोषणाला बसणार- आमदार रोहित पवार

कर्जत- जामखेड एमआयडीसीची अधिसूचना जाहीर करा; अन्यथा या दिवशी हजारोंच्या संख्येने उपोषणाला बसणार- आमदार रोहित पवार

mahalokwaniBy mahalokwaniMay 18, 2023Updated:May 18, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत / जामखेड :-

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयावर महत्त्वाची चर्चा आणि विनंती केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत होते. दरम्यान, पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये २०१९ मध्ये आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सर्व बाजूने विचार करून सर्वेक्षण करण्यात आले व मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागाच्या मार्फत भू-निवड समितीची स्थळ पाहणी व ड्रोन सर्वेक्षण होऊन उच्चाधिकार समितीच्या बैठकीची मान्यता देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली.

143 व्या उच्चाधिकार समितीची सर्वात मोठी बैठक पार पडून बैठकीत मौजे पाटेगाव व खंडाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम 1961 तरतुदीनुसार लागू करण्यास समितीने जुलै २०२२ मध्ये मान्यताही दिली परंतु, मान्यता असताना देखील अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही. याबाबत वेळोवेळी आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला तसेच उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन अधिसूचना जाहीर करण्याबाबत पाठपुरावाही केला आहे. त्यावर मंत्री महोदयांनी निर्णय घेण्याबाबत आश्वासित केलं परंतु, अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. नुकत्याच मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांच्या भेटीमध्ये आमदार रोहित पवार यांनी दोघांकडेही मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी जाहीर करून इतर कायदेशीर बाबी या राजश्री शाहू महाराज जयंती दिनांक 26 जून 2023 पर्यंत पूर्ण कराव्यात अशी विनंती केली आहे. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत जर याबाबत ठोस निर्णय होऊन कर्जत जामखेडमधील जनतेवर राजकिय द्वेशापोटी होणारा अन्याय दूर झाला नाही तर 26 जून 2023 पासून सर्व नागरिक, युवा वर्गासह हजारोंच्या संख्येने या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे

उद्योग व्यापाराचे महत्त्व ओळखून उद्योगांना अनेक सवलती देऊन चालना देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र मंजूर असूनही केवळ राजकीय द्वेषातुन अधिसूचना झालेली नसल्याने येथील जनतेवर अन्याय होत आहे. ही बाब आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली व या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जाहीर करून इतर कायदेशीर बाबी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती पर्यंत पूर्ण कराव्यात जेणेकरून कर्जत जामखेडमधील नागरिक व युवांवर होणारा अन्याय हा दूर होईल. अन्यथा उपोषणाचा इशारा दिल्याने आता सरकार यावर गांभीर्याने विचार करणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रतिक्रिया – आमदार रोहित पवार

माझ्या मतदारसंघातील युवा वर्गासाठी व नागरिकांसाठी उपोषण करण्याची वेळ आली तर मी त्याला तयार आहे. केवळ राजकीय द्वेषातून मंजूर झालेली एमआयडीसी ही फक्त पुढे-पुढे ढकलून सामान्य लोकांवरच अन्याय होतोय हे सत्तेत असलेल्या लोकांनी लक्षात घ्यावं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleविखे-पिता पुत्र व राम शिंदेंचा संघर्ष; मग पवारांना साथ देतंय तरी कोण ? वाचा सविस्तर..
Next Article जामखेड न्यूज| राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सावळा गोंधळ; पहा व्हिडिओच्या माध्यमातून
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.