Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या अंतिम मंजुरीसाठी मतदारसंघातील युवकाचं उद्योगमंत्र्यांना थेट रक्ताने पत्र

कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या अंतिम मंजुरीसाठी मतदारसंघातील युवकाचं उद्योगमंत्र्यांना थेट रक्ताने पत्र

mahalokwaniBy mahalokwaniAugust 2, 2023Updated:August 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून उद्योगमंत्र्यांना एमआयडीसी मंजुरीसाठी कळकळीची विनंती

कर्जत/जामखेड | गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा हा चांगलाच तापला असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या मंजुरीसाठी आमदार रोहित पवार हे देखील विधान भवन परिसरात आंदोलनाला बसले होते

दरम्यान, राज्य सरकार एमआयडीसीला मंजुरी देत नसल्याने व त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने मतदारसंघातील नागरिक व युवांनी देखील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले होते. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात देखील कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी बाबतचे फलक झळकावल्याचे पाहायला मिळाले. एवढं सगळं करूनही शासन अजूनही एमआयडीसीला मंजुरी देत नसल्याने कर्जत जामखेड मतदारसंघातील नान्नज या गावातील अमर चाऊस या युवकाने स्वतःच्या रक्ताने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर करून द्यावी यासाठी पत्र लिहिले आहे.

उद्योग मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेला मजकूर खालील प्रमाणे –

“मा. उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, एक सर्वसामान्य बेरोजगार युवक म्हणून आमच्या कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व युवा व नागरिकांच्या वतीने माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आमच्या हक्काच्या एमआयडीसीला कृपा करून मंजुरी द्या आणि आमच्या हाताला काम मिळू द्या! आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि गंभीर परिस्थितीचा विचार करून रोहितदादांच्या एमआयडीसीबाबतीतच्या मागणीला मान्य करा एवढीच कळकळीची विनंती!”

अशा आशयाचं पत्र थेट स्वतःच्या रक्ताने लिहून ते आता उद्योग मंत्र्यांना दिले जाणार आहे. यावरून तरुणांमध्ये एमआयडीसी व्हावी याबाबत किती तीव्र इच्छा आहे हे दिसून येत आहे. सरकारने लवकरात लवकर एमआयडीसी मंजुरी बाबतचा हा तिढा सोडवावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व युवांकडून व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleGautamai Patil | गौतमी पाटील कार्यक्रम करणार नाही; या कारणामुळे गौतमीने घेतला निर्णय..वाचा सविस्तर
Next Article जामखेडमध्ये महसूल सप्ताह 2023 ची सुरुवात;नागेश विद्यालया पासून सुरवात..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.