Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कर्जत-जामखेड मतदारसंघातील 10 हजार गरजू विद्यार्थ्यांना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते सायकलचे वाटप

कर्जत-जामखेड मतदारसंघातील 10 हजार गरजू विद्यार्थ्यांना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते सायकलचे वाटप

mahalokwaniBy mahalokwaniMarch 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार रोहित पवार यांची शालेय विद्यार्थ्यांना अनोखी भेट; मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुखकर

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

कर्जत / जामखेड | आमदार झाल्यापासून मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मतदारसंघातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये या बाबीकडे विशेष लक्ष घातले. नुकताच मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी अभिनव उपक्रम राबवला आहे. त्यानुसार मतदारसंघातील तब्बल १० हजार ५ वी ते १० वीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती ऍग्रो व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या सहकार्याने मोफत सायकलचे वितरण करण्यात आले.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या हस्ते कर्जत-जामखेड मतदारसंघातील तब्बल दहा हजार गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. पर गावाहून वाड्या-वस्त्यांवरून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात काही ठिकाणी एसटीचीही सोय नसते प्रसंगी मिळेल त्या वाहनाने अथवा पायपीट करत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. तसेच सायकल घेऊन देण्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसते. अशा परिस्थितीचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना सायकल देऊन त्यांची शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व शाळेत येण्या-जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून गरजू विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात १० हजार शालेय विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या असून पुढील टप्प्यात आणखी विद्यार्थ्यांना सायकल देण्याचा मानस आहे, असं सांगण्यात आलं आहे.

कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवडे यांनी आपल्या सुमधुर वाणीतील गायनाने उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच काही शालेय विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले.

यावेळी बोलत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक करत आमदार रोहित पवार यांनी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिल्याबद्दल तसेच मतदारसंघांत सुरू असलेल्या विविध स्तुत्य कामांबाबत त्यांचं अभिनंदन केलं. विद्यार्थी उज्ज्वल भविष्यासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. तसेच येत्या काळातही अशाच पद्धतीनं विद्यार्थी हिताचे आणखी विविध उपक्रम मतदारसंघात राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाथर्डी| चिंचपूर पांगुळ येथील ग्रामदैवत (मलकेश्वर)सालशीदबाबा यात्रोत्सवाची कुस्त्याचा हंगामाने सांगता.!
Next Article कोरोनाचा पुन्हा उद्रेक वाढतोय; राज्यात 1956 सक्रिय रुग्णांची नोंद तर दोन जणांचा मृत्यू !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.