रौप्य महोत्सवी कांकरिया करंडक राज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव विजेता नाट्य संघ सप्तरंग थिएटर्स अहमदनगर तर उपविजेता नाट्य संघ नाट्यअराधना अहमदनगर
अभिनेत्री निशागंधा वाड यांच्या हस्ते पारितोषीक वितरण
महालोकवाणी न्यूज ता. २ भविष्याचे स्वप्न घडवण्यासाठी कांकरिया करंडक सारख्या व्यासपिठीची गरज आहे. राज्यातील बाल कलाकरांना घडवण्यासाठी गेली २५ वर्ष कांकरिया करंडक हा उपक्रम राबवत असून यातून हजारो कलावंत घडत गेले, मी कांकरिया करंडकाचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन करते. सध्याची पिढी खूप धिट आहे. या मुखवट्यांच्या जगात तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता. स्वताःशी स्पर्धा करा, यश, अपयश तितक्याच सहजपणे स्विकारा असे मत सिने अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांनी कांकरिया करंडकच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या पारितोषीक वितरण प्रसंगी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे होते.
मराठवाडा मित्र मंडळ, मानकन्हैया ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव कांकरिया करंडक रौप्य महोत्सवी वर्षाच्या पारितोषीक वितरणासाठी सिने अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे, अमोल खोले, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, स्वागताध्यक्ष डॉ. सुधा कांकरिया, सचिव सदाशिव मोहिते, किरण कांकरिया, परिक्षक सागर लोधी (पुणे) मिरा शेंडगे (सोलापूर) संजय पेंडसे (कोल्हापूर) लेखक परिक्षक सदानंद भणगे उपस्थीत होते.
डॉ. प्रकाश कांकरिया यांनी कांकरिया करंडक बालगोपाळांसाठी वरदान ठरत आहे असे सांगुन मान्यवरांचे स्वागत केले, स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया यांनी कांकरिया करंडकचा २५ वर्षाचा इतिहास मांडला व भविष्यकालीन योजनांची माहिती दिली. गेल्या २५ वर्षात पाचशेहून अधिक संघ व राज्यभरातील ८ हजार बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत राज्यातील बालरंगभूमीला कांकरिया करंडक वेगळी दिशा देण्याचे काम करीत आहे. कांकरिया करंडकाने राष्ट्रपती विजेता पुष्कर तांबोळी सहित चित्रपट,नाटय, मालिका यांना २१ चमकते सितारे बहाल केले. असे त्या म्हणाल्या या वेळी डॉ. जावळे, अमोल खोले यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निकाल वाचन गौरी जोशी यांनी तर परिक्षकांचा परिचय डॉ. विजय जोशी यांनी तर आभार दत्ता इंगळे यांनी मानले.
सोलापुरात मोठी दुर्घटना, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, बार्शी तालुक्यात खळबळ
सोलापुरात मोठी दुर्घटना, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, बार्शी तालुक्यात खळबळ
कांकरिया करंडक रौप्यमहोत्सवी वर्ष यशस्वी करण्यासाठी सदाशिव मोहिते, किरण कांकरिया, रमेश छाजेड, उमाकांत जांभळे, दत्ता इंगळे, शशिकांत नजान, नंदकुमार देशपांडे, सुभाष बागूल, मनोहर कटके, पुरूषोत्तम दरबस्तवार, डॉ. सुभाष बागले, प्रिया सोनटक्के, नंदकुमार देशपांडे, गाणपतराव लोखंडे, दिपक शिरसूल रामदास केदार यांनी परीश्रम घेतले.
निकाल पुढील प्रमाणे
एकांकिका प्रथम- अजब लोठ्यांची महान गोष्ट, सप्तरंग थिएटर्स, द्वितीय- एक रात्र गडावर, नाट्य अराधना, अहमदनगर, तृतीय- नापास, आनंद एज्युकेशन सोसा. पुणे.
सर्वोत्कृष्ठ लेखन-आनंद खरबस,
दिग्दर्शन प्रथम आरती अकोलकर (सप्तरंग), द्वितीय अनंत जोशी (नाट्यअराधना) तृतीय नरेश डोंगरवाल (पुणे)
अभिनय पुरूष, प्रथम- साहिर झावरे, द्वितीय- शर्व दाते, तृतीय- कैवल्य चांदवले.
स्त्री अभिनय, प्रथम- गायत्री लोहकर, द्वितीय- अनन्या जोशी, तृतीय- अंतरा पाटील.
संगीत, प्रथम- शैलेश देशमुख, द्वितीय- संजय सुर्यवंशी. नेपथ्थ, प्रथम- लक्ष्मीकांत देशमुख, द्वितीय- अमोल बंटी, शेव्ता अंबिकर.
प्रकाश योजना, प्रथम-मोनिश ढाळे, द्वितीय- भारती लिमकर,
रंगभूषा, प्रथम- दिप्ती पवार, द्वितीय- बाली अडगटला.
विशेष बाल उत्तेजनार्थ- प्रथम- अथर्व ढेंबे, द्वितीय- आयर्न साने, तृतीय प्रगती पानसरे, चतुर्थ-श्रद्दा वाघमारे.

अहमदनगर: मराठवाडा मित्र मंडळ, मानकन्हैया ट्रस्ट आयोजित रौप्य महोत्सवी कांकरिया करंडक स्पर्धेतील विजेता सप्तरंग थिएटर्स ला करंडक प्रदान करताना सिने अभिनेत्री निशागंधा वाड. समवेत डॉ. पंकज जावळे, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, अमोल खोले, सदाशिव मोहिते, परिक्षक सागर लोधी, संजय पेंडसे, मिरा शेंडगे, सदानंद भणगे, उमाकांत जांभळे, नंदकुमार देशपांडे, सुभाष बागुल, मनोहर कटके, पुरूषोत्तम दरबस्तवार, शशिकांत नजान, गणपत लोखंडे आदी , स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया