जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
देशाचा सैनिक देशासाठी प्राण गेला तरीही मागे सरकत नाही तर ते लढतच राहतात. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी सर्व प्रशासकीय विभाग मदतीसाठी तयार आहेत.

26 जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद झालेल्या सर्व जवानांना मानवंदना देऊन आदरणीय वाहतो असे मनोगत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुका माजी सैनिक संघटना व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यामाने जामखेड मध्ये 24 वा कारगिल विजय दिवस अतिशय उत्साहात साजरा करून शहीद जवानांना मानवंदना देऊन आदरांजली अर्पण करण्यात आली .
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, जामखेड महाविद्यालय जामखेड चे प्राचार्य एम एल डोंगरे,एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर,उद्योजक विनायक राऊत आदींची भाषणे झाली.

यावेळी प्रमुख उपस्थिती जामखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे ,पोलीस निरीक्षक महेश पाटील,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे, भूमीलेखचे डोळस साहेब, नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे सदस्य उद्योजक विनायक राऊत, प्राचार्य डोंगरे एम एल ,प्राचार्य श्रीकांत होशिंग ,प्राचार्य मडके बि के, कन्या विद्यालय पर्यवेक्षक संजय हजारे, सर्कल-नंदकुमार गव्हाणे , पारनेर बँक संचालक दत्तात्रय सोले, एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनिल देडे, थर्ड ऑफिसर मयूर भोसले

शिवप्रतिष्ठान अध्यक्ष पांडुरंग भोसले, माजी सैनिक संघटना संस्थापक बजरंग डोके ,अध्यक्ष दिनकर भोरे उपाध्यक्ष नानासाहेब बाबर, सचिव अंकुश जगदाळे ,खजिनदार शिवाजी साळुंखे, क्रांतिवीर अकॅडमी चे संचालक रावसाहेब जाधव ,उद्योजक किसन चिलगर मेजर ,लाव्हाळे मेजर सिंगते मेजर, संतोष कदम ,गर्जे मेजर, नागरगोजे मेजर, आशाताई आंधळे ,योगेश सुरवसे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, मंडल अधिकारी रविंद्र जोशी, देसुरकर मेजर, अनिल जावळे, ॲडव्होकेट प्रमोद राऊत, नागरगोजे, जगन्नाथ म्हेत्रे,भाऊ पोटफोडे आदी आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ एनसीसी कॅडेट, पत्रकार उपस्थित होते.

त्यानंतर जामखेड येथील शहीद स्मारक यांचे पूजन करण्यात आले तसेच सर्व अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा विजय असो भारत माता की जय भारतीय सेनेचा विजय असो जय जवान जय किसान अशा घोषणेने परिसर दुमदुमून निघाला सूत्रसंचलन अनिल देडे , तर आभार प्रदर्शन मयूर भोसले यांनी केले

