पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे..
महालोकवाणी न्यूज ता . 21
किरकोळ कारणातून भांडण होऊन मलठण तालुका दौंड येथे ऐकाला आपला जिव गमवावा लागला या बाबत हर्षदा नारायण डोईफोडे राहणार मलठण यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे दौंड पोलिसांनी अमोल सुनील लवंगरे राहणार.. मलठण याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.दौंड पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहिती नुसार शनिवारी दिनांक 11 रोजी रात्री 10 वाजता मलठण येथे फिर्यादी यांच्या राहत्या त्यांचे पती लक्ष्मण डोईफोडे व अमोल लवंगरे यांच्यामध्ये कसल्यातरी कारणावरून भांडण झाले.
या भांडणांमध्ये अमोल लवंगरे याने कोणत्यातरी हत्याराने फिर्यादी यांचे पती नारायण डोईफोडे यांना डोक्यात गंभीर जखमी .केले होते त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीस दौंड येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले गेले परंतू जखमीची तब्येत खालावल्याने जखमीला। पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते परंतु रविवारी दिनांक 18 रोजी हॉस्पिटलमध्ये डोईफोडे यांचे निधन झाले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अमोल लवंगरे वरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील दौंड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
