Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कोरोनाचा पुन्हा उद्रेक वाढतोय; राज्यात 1956 सक्रिय रुग्णांची नोंद तर दोन जणांचा मृत्यू !

कोरोनाचा पुन्हा उद्रेक वाढतोय; राज्यात 1956 सक्रिय रुग्णांची नोंद तर दोन जणांचा मृत्यू !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 26, 2023Updated:March 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : गेल्या काही दिवासांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने सुटकेचा श्वास सोडणाऱ्या राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात शनिवारी 437 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर आज राज्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

✦ सक्रिय रुग्णसंख्या वाढली
राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 1956 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,71,795 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत.

✦ पुणेकरांची चिंता वाढली
शनिवारी राज्यात 437 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 242 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात 571 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्याचा क्रमांक आहे. राज्यात कोरोनाच्या दोन मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे

✦ दोन कोरोना मृत्यूची नोंद
राज्यात एकूण 242 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 79,91, 066 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.15 टक्के इतकं झालं आहे. राज्यात दोन कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या 81,41, 457 इतकी झाली आहे.

✦ कोरोना संसर्ग झाल्यास ‘ही’ औषधं टाळा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्या भारतात कोरोनाच्या प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी ‘लोपीनाविर-रिटोनावीर’, ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’, ‘आयव्हरमेक्टिन’, ‘मोलनुपिराविर’, ‘फॅविपिरावीर’, ‘अझिथ्रोमायसिन’ आणि ‘डॉक्सीसायक्लिन’ यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत, असं सांगण्यात आलं आहे.

✦ राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन
पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

✦ कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी
आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जत-जामखेड मतदारसंघातील 10 हजार गरजू विद्यार्थ्यांना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते सायकलचे वाटप
Next Article कार-बाइक्सऐवजी बोटीने प्रवास करतात लोक; वाचा जगातील ‘या’ अजब गावाची गजब कहाणी !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.