Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खर्डा येथील शुक्रवार पेठीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनी काढली विद्यार्थ्यांची बाल दिंडी.!

खर्डा येथील शुक्रवार पेठीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनी काढली विद्यार्थ्यांची बाल दिंडी.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 28, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार
आज बुधवार दि 28 जून रोजी खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा येथील मुलांनी, मुलींनी व शुक्रवार पेठ शाळेने विद्यार्थ्यांची शाळेतून सिताराम गडावर दिंडी काढली या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या वेषातील मुले तसेच विणाकरी, मृदुंग वादक व टाळकरी ध्वजधारी विद्यार्थी आणि सर्व वारकरी विद्यार्थी सजून आले होते .

गावातून पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढून सिताराम गड या ठिकाणी दिंडी नेण्यात आली. दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून गावचे सरपंच सौ संजीवनी ताई वैजनाथ पाटील यांनी पालखीचे पूजन करून दिंडीचे प्रस्थान केले .त्यांचे तर्फे सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आली. शाळेमध्ये व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत गुरसाळी व महेश गोलेकर यांनी दिंडीचे स्वागत केले.

त्यानंतर गावामध्ये श्री कल्याण तात्या सुरवसे मित्र मंडळाच्या वतीने देखील दिंडीचे स्वागत केले व सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप केली .ग्रामपंचायत खर्डाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य श्री महालिंग कोरे व श्री गणेश शिंदे यांनी दिंडीचे स्वागत केले. एसटी स्टँडच्या प्रांगणामध्ये माजी सभापती सौ मनीषाताई रवींद्र सुरवसे यांनी दिंडीचे स्वागत केले. त्याचबरोबर श्री क्षेत्र सिताराम गड या ठिकाणी श्री दिगंबर थोरात ,श्री पोपट भुते ,श्री आबा गोलेकर यांनी दिंडीचे स्वागत केले. सिताराम गड संस्थांनच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गोड लापशी व भाताचे जेवण देण्यात आले. आज विद्यार्थ्यांची बाल दिंडी सिताराम गडावर गेल्यानंतर खर्डा परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाचे आगमन झाले .दिंडीमुळे गावात पाऊस पडला अशी एक सर्वत्र चर्चा सुरू झाली

या बालदिंडीमुळे वारकरी सांप्रदायाचा एक वारसा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुचला गेला. या दिंडीमुळे सर्व विद्यार्थी पालक व गावातील नागरिक आनंदी झाले होते. दिंडीच्या आयोजनासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच खर्डा ग्रामपंचायत आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी खूप मोलाचे सहकार्य केले .

खर्डा मुले शाळेचे मुख्याध्यापक श्री राम निकम सर , खर्डा मुली शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबुराव गीते सर, मोहोळकर सर खामगळ सर, अरण्ये सर, वहील सर गोरे सर ,साबळे सर ,सय्यद सर रासकर मॅडम, ढवळशंख मॅडम, मानेकर मॅडम, पाटील मॅडम ,वराडे मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुक्रवार पेठ मुख्याध्यापक कामिनी राजगुरू मॅडम ,गलांडे मॅडम आधी सर्व शिक्षक पालक व व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी दिंडी चांगल्या प्रकारे आयोजित करण्यासाठी सहकार्य व परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleHDFC BANK| 1 जुलैपासून HDFC बँकच्या, करोडो ग्राहकांवर होणार हा परिणाम.! वाचा सविस्तर बातमी
Next Article सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ सर यांच्यातर्फे; आषाढी एकादशी निमित्त धाकटी पंढरीसाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बसेस..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.