पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे.
दिनांक .25/03/2023 रोजी खानवटे तालुका दौंड .भिगवन राशिन रोड .वरती असणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग उड्डाण फुलाशेजारी खानवटे गावच्या बाजूस आंदाजे 700 फुट .अंतरावर एका अनोळखी तरुणाचा रेल्वे ट्रॅक शेजारी मृतदेह सापडला आहे,

त्याच्या अंगावर निळसर रंगाचा चौखडा शर्ट.राखाड्या रंगाची पॅन्ट तांबड्या कलरचा कंबरेचा बेल्ट तसेच त्याच्या खिशामध्ये मुस्लिम समाज वापरत असलेली गोल टोपी सापडली आहे ..त्यामुळे हा तरुण मुस्लिम समाजाचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या तरुणाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे.

या अनोळखी तरूणा बाबत काही माहिती अगर कोणी ओळखत असल्यास दौंड पोलीस स्टेशन येथे फोन नंबर ..02117262333 या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
