जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार
सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, सन-२०१० विजय गहिनीनाथ चव्हाण रा. सावरगाव ता. जामखेड याने सावरगाव ता. जामखेड येथे एका महिलेचा खुन केलेला आहे. सदर वेळी त्याचे विरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं.२६१/२०१० भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक स्वर्गीय श्री. ज्ञानेश्वर ढोकले व त्यांचे पथकाने करुन आरोपी याचे विरुद्ध मा. न्यायालयात भरभक्कम पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केलेले होते. तद्नंतर सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांचे न्यायालयात होवुन आरोपी याचे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने सन २०१२ मध्ये त्यास मा. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. तेव्हा पासुन आरोपी नामे विजय गहिनीनाथ चव्हाण हा शिक्षा भोगत होता.
हे ही वाचा:– Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..
मागील सुमारे ०१ वर्षांपूर्वी बंदी विजय गहिनीनाथ चव्हाण हा विसापुर जिल्हा खुले कारागृह, विसापुर ता.श्रीगोंद येथून फरार झालेला होता. त्या बाबत त्याचे विरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा देखील नोंदविणेत आलेला आहे.
नमुद बंदी हा अधुन मधुन सावरगाव येथे येत असल्याची माहिती मिळालेने मागील सुमारे ०३ महिन्यांपासून पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार पोहेकॉ. संजय लाटे व पो. कॉ. सचिन पिरगळ असे त्याचेवर पाळत ठेवून होते परंतु तो गुंगारा देण्यास यशस्वी
होत होता.
परंतु दिनांक ०४/०२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीचे आधारे पोलीस अंमलदार नामे पोहेकॉ संजय लाटे, पोना. अविनाश ढेरे, पोकॉ. प्रकाश जाधव, पोकों. सचिन पिरगळ व चालक पोहेकॉ. भगवान पालवे यांनी पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत बारकाईने व गोपणीयरीत्या त्याची माहिती काढून, त्याचेवर नजर ठेवुन मोठया शिताफीने सावरगाव ता. जामखेड येथे ताब्यात घेवुन त्यास अटक केलेली आहे. सदरचा बंदी यांस पुनश्च कारागृहात दाखल करणेकामी रवाना करण्यात आलेले आहे.
