Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गावठी कट्टयाने धमकावणाऱ्या आरोपीस अटक व सुटका

गावठी कट्टयाने धमकावणाऱ्या आरोपीस अटक व सुटका

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पत्नीने तक्रार दखल केल्याचा राग

महालोकवाणी न्यूज

पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून संतोष उर्फ पप्पू भिमाजी खोसे याने गावठी कट्टयाचा धाक दाखवून तुला रहायचे आहे का? तुला गोळया घालून ठार मारून टाकेल अशी धमकी दिल्याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासंदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अरूण गणपत दाते ( वय ४२,रा. वासुंदे) हे राहत्या घराजवळील विहीरीवरुन पाणी आणण्यासाठी गेले असता संतोष खोसे तेथे आला. तुझ्या बायकोने माझ्या विरूध्द पोलिस ठाण्यात फिर्याद का दिली ? तुला जिवंत गोळया घालून ठार मारून टाकेल अशी धमकी दिली. त्याच्यासोबत विकास सुरेश रोकडे (रा. वडगांव सावताळ ता. पारनेर ) हा देखील होता. धमकी दिल्यानंतर संतोष खोसे व विकास रोकडे हे दोघे पुन्हा दाते यांच्या घरी गेले. घरात शिरून तुझ्या बायकोने पोलिस ठाण्यात तक्रार का दिली आहे अशी विचारणा करीत गोळया घालून मारून टाकेल अशी धमकी देत शिविगाळ, दमदाटी करण्यात आली.

दाते यांनी यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात जाऊन दोघा आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. त्यांच्याविरोधात हल्ला करण्याची पुर्वतयारी करून गृहअतिक्रमण करणे, शांतताभंग घडवून आणणे, फौजदारीपात्र धाकदपटशा दाखविणे यासह हत्यार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण लागल्यानंतर आरोपी संतोष खोसे हा पसार झाला होता. पोलिस पथक त्याचा शोध घेत असताना दि. ६ जानेवारी रोजी तो त्याच्या राहत्या घरी आल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत समजली. पथकाने त्याच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेतले. तर संतोष खोसे याने दिलेल्या माहीतीनुसार सुरेश रोकडे यालाही ताब्यात घेण्यात आले. रोकडे हा आणखी एक गुन्हयात आरोपी असल्याने या गुन्हयाप्रकरणी त्यास वर्ग करण्यात आले. दरम्यान, तपासादरम्यान, आरोपी रोकडे याने या गुन्हात वापरण्यात आलेला गावठी कटटा घराच्या पडवीमध्ये असलेल्या टीपमध्ये लपवून ठेवला असल्याचे सांगितले. पोलिस पथकाने घरून तो कट्टा हस्तगत केला.

आरोपीला जामीन मंजुर

आरोपी संतोष उर्फ पप्पू भिमाजी खोसे यास न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याची जामीनीवर सुटका केली. आरोपीचे वकील अ‍ॅड. राहुल झावरे व अ‍ॅड. स्नेहा झावरे यांनी राजस्तान न्यायालयाच्या विविध दाखल्यांचा संदर्भ देत तसेच आरोपीकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. शिवाय आरोपीवर त्याचे कुटूंब अवलंबून असल्याचा युक्तीवाद झावरे दांम्पत्याने केला. न्यायालयाने तो ग्राहय धरून आरोपीची जामीनावर मुक्तता केली. अ‍ॅड. राहूल झावरे व अ‍ॅड. स्नेहा झावरे यांनी आरोपींच्या वतीने काम पाहिले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमुलगी झाली म्हणून आईने केले हे भयानक कृत्य..!
Next Article महसूल विभाग व वाळू माफिया यांच्या संगनमताने अंजनगाव ता. बारामती येथे वाळू उपसा सर्रास चालू..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.