Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम !

गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 20, 2022Updated:December 20, 2022No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आपण रोजच्या स्वंयपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतो. पण अनेकदा कळत-नकळत गॅसचा स्फोट होतो आणि नको ते घडतं. दोनच दिवसांपूर्वी राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील भुंगरा गावात एका लग्न समारंभात ६ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन किमान ८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेला हा पहिला अपघात नाही. अशा घटना या आधीही झाल्या. मात्र, तुमच्या घरात स्वयंपाकाच्या गॅसमुळे अपघात झाला तर तुम्ही तेल कंपनीकडून नुकसान भरपाई घेऊ शकता, हे तुम्हाला माहित आहे का? याच विषयी जाणून घेऊ..

भारतामध्ये सर्वाधिक संख्येने घरामध्ये LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना सावधानता बाळगली नाही तर दूर्घटना होण्याचा धोका असतो. LPG गॅस सिलेंडर दुर्घटनेमध्ये जखमी होण्याची किंवा एखाद्याचा मृत्यू होण्याची भीती असते. तसेच घरातील मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे एलपीजी गॅस कनेक्शन घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत इन्श्युरन्स मिळतो. यासाठी ग्राहकाला वेगळा अपघात विमा घ्यायची गरज नसते.

▶ LPG गॅस सिलेंडर किती मिळतो विमा?

घरगुती LPG गॅस सिलेंडरवर ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. त्यातील महत्वाची सुविधा म्हणजे, एलपीजी ग्राहकांना ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. गॅस सिलिंडरमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी विमा दिला जातो. जेव्हा ग्राहक गॅस कनेक्शन घेतात, तेव्हा गॅस कनेक्शनसोबतच ग्राहकांना ४० लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. याशिवाय सिलेंडरच्या स्फोटामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचा दावा केला जाऊ शकतो. तर ग्राहकाच्या मालमत्तेचे किंवा घराचे नुकसान झालं असेल तर दोन लाख रुपयापर्यंत नुकासान भरपाई मिळते.

▶ दावा करण्याची प्रक्रिया काय आहे?

अपघातानंतर दावा करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट http://mylpg.in वर देण्यात आली. या वेबसाईटनुसार, जर कोणतीही व्यक्ती LPG कनेक्शन घेते आणि त्याने घेतलेल्या त्या सिलेंडरमधून कोणतीही दुर्घटना होते तेव्हा त्याला ५० लाख रुपयांच्या विम्याचा दावा करता येऊ शकतो. ग्राहकाने थेट विमा कंपनीकडे जाण्याची किंवा दाव्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही. तर ग्राहकाने अपघात झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याच्या वितरकाला आणि जवळच्या पोलिसांना अपघाताची लेखी तक्रार करावी लागते. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दिलेली एफआयआरची प्रत गॅस डिस्ट्रीब्यूटरला एफआयआरची द्यावी लागेल. दावा करतांना एफआयआरच्या प्रतसोबतच मृत्यू झाल्यास वैद्यकीय पावती, रुग्णालयाचे बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यू प्रमाणपत्रही आवश्यक आहे. हे कागदपत्र डिस्ट्रीब्युटरला दिल्यानंतर डिस्ट्रीब्युटर ही माहिती तेल कंपनी आणि इन्शूरन्स कंपनीला देईल. त्यानंतर तेल कंपनीकडून संबंधित घटनेबाबत दूर्घटनेचं कारण तपासेल. तपासानंतर गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेलं नुकसानाची रक्कम ही टीम ठरवेल. त्यानंतर तेल कंपनी क्लेम केलेली रक्कम डिस्ट्रीब्युटरकडे पाठवते. ही रक्कम डिस्ट्रीब्युटरजवळ जमा झाली की, डिस्ट्रीब्युटर ही रक्कम ग्राहकाला सुपूर्द करेल.

▶ सिलिंडर घेतांना काळजी घ्याल?

या विमा संरक्षणाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही जेव्हाही सिलिंडर घ्याल तेव्हा तुमच्या सिलेंडरची एक्सपायरी डेट निघून गेलेली नाही याची खात्री करा. आणि नेहमी एक्स्पायरी डेट पाहूनच सिलेंडर घ्या. कारण ते विमा सिलेंडरच्या एक्सपायरी डेटशी जोडलेले असते. दाव्याचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांचे सिलेंडर पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर ISI मार्कचे आहेत.

▶ विम्याची रक्कम देण्यापूर्वी कंपनी तपासणी करते !
अपघात विम्याची रक्कम देण्यापूर्वी कंपनी स्फोट झालेल्या ठिकाणाची तपासणी करते. स्फोट किंवा अपघात गॅस सिलेंडरमुळेच झाला आहे का? हे या तपासात पाहिलं जातं. तपासादरम्यान कंपनीला जर गॅस सिलिंडरमुळे अपघात झाला असून त्यामध्ये नुकसान झाल्याचं समोर आल्यास योग्य ती नुकासान भरपाई दिली जाते. दुसरं म्हणजे, अपघाताच्या परिस्थितीत आगीचा मुख्य कारण दुसरे असेल तर या विमा संरक्षणाचा लाभ उपलब्ध मिळणार नाही, अशी तरतुद या पॉलिसीमध्ये आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखानवटे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचा कलशारोहन समारंभ – गोविंद महाराज शिंदे यांच्या हस्ते संपन्न
Next Article सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – फडणवीस सरकारने वर्चस्व !
mahalokwani
  • Website

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…

fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.