सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी :
यावेळी अनुसूचित जाती-जमाती भटके विमुक्त अधिकार फोरम तथा भाजपचे महाराष्ट्र अनु.जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष ऍड वाल्मिक निकाळजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
तर अध्यक्षस्थानी भाजप नेते धनंजय बडे पाटील हे होते. याप्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार जगदीश गाडे,वसंत बोर्डे,अशोक निकाळजे, मानवाधिकार कार्यकर्ते परीक्षित शिंदे,आजीनाथ बडे,तुकाराम बडे,सोनू देठे आदींची व्यसपीठावर उपस्थित होती.
गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुस्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी ऍड निकाळजे बोलतांना म्हणाले की, आपण बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी करतो ती चांगली गोष्ट आहे. परंतु आपले सर्वात जास्त प्रेम कशावर आहे.तर खाणे,पिणे,नाचणे यावर आहे.
डीजे,खाजे, पिजे, गाजे यापलीकडे आपला समाज जात नाही. फोटोला,हार घालतो, पुतळा पूजतो,पण याचा विचार करत नाही की,”बाबासाहेब हे खाण्यात पिण्यात नाहीत तर पुस्तकांत, विद्यापीठात आहेत. बाबासाहेबानी धर्म, शास्र दिला परंतु तुम्ही त्यातला काहीच घेतले नाही.
बाबासाहेब डोक्यात घेतले पाहिजेत.
किती वर्षे मनुवाद,ब्राम्हणवाद,सवर्णवाद करत शिव्या देत बसणार.आपल्याला आता हे सोडून दयावे लागणार आहे. शाळेतून मुलगा मुलगी घरी आल्यावर त्याला महिलांनी वाचायला लावावे.,पण आता वाचन नाही तर नाचणं आहे.
यावेळी जगदीश गाडे,वसंत बोर्डे ,यांची भाषणे झाली.
धनंजय बडे यांनी सांगितले की आपण महापुरुषांना वाटून न घेता एकत्र करून त्यांचे विचार प्रत्येकाच्या नसानसात रुजवले पाहिजेत. त्यांनी सांगितले ल्या मार्गावर चालले पाहिजे तेव्हाच आपल्याला प्रगतीचे फळे चाखायला मिळतील. यावेळी निकाळजे पुढे बोलतांना म्हणाले की,बाबासाहेबानी धर्म स्वीकारला आणि सांगितले की “मी तुम्हाला ‘बुद्ध’देत आहे. तुम्ही त्याला ‘महार’ करू नका. आणि आपण काय केले त्याना महार करून टाकले.”
मी मोठा आहे हे सोडून देण्याची गरज आहे. कारण समाज हा मोठा आहे. आजकाल संविधान बदलणारेच संविधान संपणार म्हणून बोंबा ठोकत आहेत.४२ वेळा काँग्रेसने संविधान बदलले.आणि आपल्या डोक्यात खूळ घालत आहेत.
दोन कोटी नोकरदार समाज आहे.त्यानी प्रत्येकाने दहा लोकं दत्तक घ्यावेत याने वीस कोटी लोकं सुधारतील.
यावेळी भाऊसाहेब रंधवे, नवनाथ खंडागळे,आनंद रंधवे, उद्धव केदार,माचिंद्र खंडागळे,सोनाजी बडे,नितीन साळवे,बाळासाहेब बडे,लक्ष्मण साळवे,शिवाजी रंधवे, जलील शेख,संजय बारगजे,गौतम रधवे,नितीन बारगजे,
भगवान रंधवे, मुरलीधर रंधवे, संभाजी रंधवे, पप्पू साळवे,प्रकाश साळवे,दीपक साखरे,भगवान रंधवे, सूर्यभान साखरे,महादेव रंधवे,साहेबराव रधवे,आदींसह महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सोमराज बडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब रंधवे यांनी केले.
