Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? खासदार अमोल कोल्हे यांचा पुराव्यासह खुलासा !

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? खासदार अमोल कोल्हे यांचा पुराव्यासह खुलासा !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक होते, यावरून वाद पेटला आहे.आता या वादावर राष्ट्रवादीचे आमदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर असल्याचे पुरावे स्पष्ट नसून स्वराज्य रक्षक ही बिरुदावली व्यापक आहे’ अशी भूमिका मांडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाला खासदार अमोल कोल्हेंनी साथ दिली आहे.

स्वराज्य रक्षक मालिक करत असताना मला जे जाणवलं त्यावरून बोलणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतरावर बंदी आणली होती. छत्रपती संभाजी राजे यांनी धर्मासाठी बलिदान दिलं म्हणून धर्मवीर म्हटलं जात असल्याचं काही जण सांगत आहे. पण, समकालिन इतिहासामध्ये संभाजीराजे यांना कैद केल्यानंतर स्वराज्याचा खजिना कुठे आहे? औरंगजेबाची कोण कोण माणसं तुमच्यासोबत सामील आहे? हे दोन्ही प्रश्न विचारले गेले होते, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. फक्त धर्मासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी संभाजीराजेंनी नकार दिला, याबद्दल कुठेही पुरावे मिळत नाही, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला.

https://www.youtube.com/embed/LAP7GM2nnnI

‘सभासदांची बखर आणि मल्हारराव चिटणीस यांची बखर येते. चिटणीस यांच्या बखरीमध्ये संभाजीराजेंना जीवे मारण्याचा कट रचला होता, यासाठी मल्हारराव चिटणीस यांचा पंजोबा बाळाजी चिटणीस आणि आजोबा आवजी चिटणीस यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. त्यानंतर चिटणीस यांच्या बखरीमध्ये अनेक नाटककार आणि कादंबरीकारांनी याचा संदर्भ घेतला. त्यामुळे ही कवी कल्पना समोर आली, असा खुलासाही अमोल कोल्हे यांनी केली.

‘संभाजी महाराज यांची प्रतिमा मलिक करण्यात आली पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं ही संकल्प समोर आली होती. संभाजी महाराजांचा शेवटचा काळ होता, एवढ्यापूरतेच धर्मवीर म्हणून मर्यादीत ठेवले गेले. पण स्वराजरक्षक ही बिरुदावली ही जास्त व्यापक ठरते, असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleYerawada Jail News ! येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यू, कारगृह प्रशासनान कडून ही कारणे
Next Article कर्करोगाशी झुंज अपयशी, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.