आजच्या माहिला व मुलींनी आपला ध्यास ओळखणे गरजेचे – श्रीम.शोभा कांबळे
जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जनविकास सेवाभावी संस्था जामखेड आयोजित वार- बुधवार दि. 8 मार्च रोजी दुपारी 1 वाजता राजमाता जिजाऊ आऊसाहेब , पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शोभा कांबळे म्हणाल्या, आजच्या माहिला व मुलींनी आपला ध्यास ओळखणे गरजे चे आहे. कर्तृत्व सिध्द करणे तसेच महिलांच्या कर्तृत्वाचा आदर सन्मान करणे म्हणजे च महिला दिन.
यावेळी गुलाब जांभळे म्हणाले,खचलेल्या माहिलांना प्रवाहात आणून त्यांना मदत करणे व व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचे आत्मविश्वास वाढवणे काळाची गरज आहे.
भारती दिदी म्हणाल्या , आजची माहिला पुरुषांच्या बरोबरीने कोणत्याही क्षेत्रात काम करित आहे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे विश्वदर्शन न्युज चे संपादक गुलाबशेठ जांभळे, आरोग्य सल्लागार गोकुळ जायभाय, अँड. एम.आर. , जालींदर काळे, हर्षद काळे, आदी उपस्थित होते .
यावेळी ब्रम्ह कुमारी भारती दिदी (ओमशांती, जामखेड), ब्रम्ह कुमारी सिमा दिदी(ओमशांती, जामखेड), श्रीम. शोभा कांबळे( मुख्याध्यापिका- शासकीय मुलांची निवासी शाळा, आरोळे नगर), श्रीम. गिता रासने( मुख्याध्यापिका- जि.प. प्राथ.शाळा, सदाफुले वस्ती), श्रीम.सुल्ताना शेख ( पर्यवेक्षिका, आरोळे हॉस्पिटल) श्रीम. वैशाली शिंदे ( माहिला कार्यकर्त्या), रश्मि गंभीर( सदस्या – संत निरंकारी मिशन,जामखेड),विजया जाधव ( सामाजिक
कार्यकर्त्या),रूक्साना पठाण ( समाजसेविका),मिराताई तंठक ( सामाजिक कार्यकर्त्या),सुनिता पिंपळे( परिचारिका- लोकमान्य हाँस्पिटल) ,अँड.रिया काळे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्का पिंपळे, जयश्री हातळगे ,निशा पवार , रेखा गायकवाड , शुभदा घायतडक , साधना जाधव ,जयमाला काळे, रुक्मिणी शिंदे आदी महिलांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमा चे सुत्रसंचलन संतोष गर्जे यांनी केले तर आभार संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लक्ष्मीताई पवार यांनी मानले.
