जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीन आजी- माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी जामखेड येथे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कृषी अधिकारी, भुमी अभिलेख अधिकारी , गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक साहेब, व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या व जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने जामखेड येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहामधे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जामखेड तालुक्यातील सर्व माजी सैनिक,आजी सैनिक, वीरमाता,वीरपिता,शहिद परिवार,वीर पत्नी या सर्वांनी उपस्थित राहुन आपल्या अडीअडचणी समंधीत अधिकाऱ्या समोर मांडाव्यात जेने करून प्रशासनाच्या वतीने त्या दुर करण्यासाठी या तालुका स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी आजी माजी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.
