Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू; आमदार प्रा राम शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला प्रश्न !

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू; आमदार प्रा राम शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला प्रश्न !

mahalokwaniBy mahalokwaniJuly 25, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार

शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या तारांचा मुद्दा, पिंपरी चिंचवड येथील रोहित्राचा स्फोटातील मृतांच्या वारसांना मदत व मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने जामखेड मधील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू या तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे आमदार प्रा राम शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

जामखेड शहरातील जुन्या डी. जे. हॉटेलच्या पाठीमागील भागातील एका घरावरून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मे २०२३ च्या चौथ्या आठवड्यात घडली होती. या घटनेवरून आमदार प्रा राम शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला.

आमदार प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर लेखी उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे की, सदर घटना खरी असून जामखेड शहरातील मुख्य वीज वाहिनी इतरत्र हलविण्याबाबत जामखेड उप विभागात नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.मयत मुलीच्या कुटुंबियांना महावितरणातर्फे तातडीची मदत म्हणून २० हजार रूपये देण्याकरीता महावितरणचे कर्मचारी गेले असता त्यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास नकार दिला,

अशी माहिती फडणवीस यांनी दिली.११ के. व्ही. वीज वाहिनीमुळे अपघात टाळण्याकरीता तातडीची उपाययोजना म्हणून सद्य:स्थितीत जामखेड शहरातील अरुंद रस्त्यालगत असलेल्या ११ के. व्ही. वीज वाहिनीकरीता कोटेड कंडक्टरची व्यवस्था करण्यात आली असून सदर काम २ ते ३ दिवसात पूर्ण करण्यात येईल. असे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्यातील शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारा व डीपीच्या दुरुस्तीची कामे सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी करणेबाबत आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रमेशदादा पाटील, आमदार उमा खापरे,आमदार प्रविण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रसाद लाड, आमदार रामदास आंबटकर,आमदार निलय नाईक, ॲड निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वीज ग्राहकांना उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी महावितरणच्या धोरणानुसार राज्यात महावितरणच्या क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्ती आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स अंतर्गत प्रत्येक स्तरावर महावितरणच्या सुचिबध्द कंत्राटदाराकडून विद्युत तारा बदलणे, झोळ आलेल्या विद्युत तारा ओढणे, जंपर बदलणे, पोल बदलणे, झाडाच्या फांद्या तोडणे, स्टेला व्यवस्थित ताणे बसविणे, रोड क्रॉस गाळ्याला गार्डींग व्यवस्थित करणे, डीस्ट्रीब्यूशन बॉक्स दुरुस्ती करणे इ. कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी करण्यात येतात. त्यामुळे संभाव्य ब्रेकडाऊन किंवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे तसेच अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले.

पिंपरी चिंचवड (जि. पुणे) परिसरातील भोसरी, इंद्रायणी नगर भागात रोहित्राचा स्फोट होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना भरपाई मिळणेबाबतचा तारांकित प्रश्न आमदार उमा खापरे, आमदार प्रसाद लाड, आमदार रमेशदादा पाटील, आमदार रामदास आंबटकर, आमदार ॲड निरंजन डावखरे, आमदार प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित केला होता.

यावर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की,भोसरी, इंद्रायणी नगर (पिंपरी चिंचवड, जि. पुणे) भागात रोहित्राचा स्फोट होऊन तिघे जण मृत्यूमुखी पडण्याची घटना घडली होती. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिघांच्या वारसांना, महावितरणच्या नियमानुसार प्रत्येकी रुपये ४ लाख याप्रमाणे एकूण रुपये १२,००,०००/- दिनांक १२/१०/२०२० रोजी देण्यात आले आहेत.उर्वरित रकमेबाबतची कार्यवाही प्रक्रियाधिन आहे.

महावितरणने अपघातास दोषी असणाऱ्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करुन, चौकशीच्या अनुषंगाने ५ अधिकारी व २ कर्मचारी यांच्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे आरोपपत्र दाखल करुन व त्यांची चौकशी करुन, दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द महावितरण कंपनीच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे, असे लेखी उत्तरात म्हटले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथील आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये भव्य लकी ड्रॉ ऑफर सोडत संपन्न; या भाग्यविजेत्यांना मिळाली ब्रेंडेड सायकल..
Next Article Manipur|मणिपूर हिंसाचाराचे नगरमध्ये पडसाद,आदिवासी विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.