Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार

जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार

mahalokwaniBy mahalokwaniJuly 19, 2023Updated:July 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

जामखेड ( जि. अहमदनगर) : जामखेड शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले.

यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलीसावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. जखमी आरोपीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

जामखेड पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव कोपनर यांनी फिर्याद दिली की, 19 रोजी 00/10 वा. चे सुमारास आरोपीत प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुने सर्व (रा. सारोळा ता. जामखेड) यांनी जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे इसम नामे अदनान जहर शेख, (रा. तपश्वररोड, जामखेड ता. जामखेड) यांचे डोक्याला पिस्टल लावून त्याच्या ताब्यातील अर्टिगा गाडीची (एमएच 12 केटी 4795) चोरी केली होती.

आम्ही आरोपीत इसम नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार, शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे यांचा शोध घेऊन आमचे सरकारी काम करीत असताना जामखेड ते खर्डा असे जाणारे रोडलगत असलेले हॉटेल साई समोरील मोकळ्या पटांगणात आरोपी नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार याने त्याचे कमरेला असलेल पिस्टल बाहेर काढुन आम्हाला जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे हातातील पिस्टल आमच्या दिशेने रोखुन, पिस्टलचे ट्रिगर दाबुन आमच्यावर गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्याचे पिस्टलमधील गोळी फायर झाली नाह. त्याचे वेळी आमचे पथकातील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपीत नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार व त्याचे साथीदार यांना ” तुझ्या हातातील पिस्टल खाली टाक, तुम्ही तिघेही सरेंडर करा” असे आवाहन करुन देखील आरोपीत यांनी त्यांचेकडील पिस्टल मधुन फायर करण्याचे उददेशाने पिस्टल पुन्हा कॉक करण्याचा प्रयत्न करुन तसेच आमचेशी झटापट व आम्हाला मारहाण केली. त्याच प्रमाणे आम्ही करीत असलेले सरकारी कामात अडथळा आणुन आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सदर वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आमचे सर्वाचे स्वसंरक्षनार्थ आरोपी इसम नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार याचे दिशेने झाडलेली गोळी त्याचे उजवे पायाचे पंजावर लागुन तो जखमी झालेला आहे. पोलीसांनी वरील सर्व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleKirit Somaiya Viral Video : ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर राष्ट्रवादी काँग्रेस किरीट सोमय्यांना कपडे भेट देणार.!
Next Article JAMKHED जामखेड तालुक्यातील कृषि महाविद्यालयात पावसाळ्यात दुष्काळ; यासंदर्भात संभाजी बिग्रेडने केली ही मागणी.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.