जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड येथे दिनांक १५ जुन २०२३ रोजी श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेडच्या वतीने जागतिक मल्लखांब दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शक्तीची देवता हनुमान व मल्लखांबचे आद्यगुरू बाळंभट्टदादा देवधर यांच्या प्रतिमेचे तसेच मल्लखांबचे पुजन जामखेड येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी मा. श्री राजेंद्र टेकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर श्री शंभुसूर्यच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब व विद्यार्थिनींनी रोप मल्लखांबची बहारदार प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मुख्य प्रशिक्षक मा.श्री बबलु (वस्ताद) टेकाळे यांनी मल्लखांब खेळाचा इतिहास,तसेच स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीत सराव केला पाहिजे,त्यासाठी लागणारा आहार कधी आणि अशा स्वरूपात घेतला पाहिजे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर संस्थेचे सचिव अमोलदादा निमोणकर यांनी आभार व्यक्त केले.हा सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री राजुदादा भांबे यांच्यासह संस्थेतील सर्वच प्रशिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मोठे कष्ट घेतले.