जामखेड शहरातील रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याने संस्थतील १९ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी मागील काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान या आत्महत्यासुद्धा संशयास्पदचं आहेत. जामखेडमध्ये घडलेल्या या विकृत कृत्याविरुद्ध जामखेड पोलीस प्रशासन, स्थानिक पत्रकार, मतदारसंघाला लाभलेले दोन्ही आमदार, समाजिक संघटना, महिला संघटना या अजूनही शांत का आहेत. अशा विकृत घटनेला कोण अभय देतंय.
ज्या राजाच्या दरबारात स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेली. आज त्याच राजाच्या राज्यात महिलांवरील अत्याचार सर्रासपणे वाढत आहे. तरीही सरकार आणि प्रशासन मूग गिळून बसलय. इतर वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व डोक्यावर घेऊन नाचणारे शिवभक्त आज शिवरायांची शिकवण विसरलेत असच म्हणावं लागेल. लोकशाहीचा चौथा मानला जाणाऱ्या पत्रकारितेला तर काही पत्रकारांनी काळिमा फासलीय. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांनी आपली लेखणीच गहाण ठेवलीय.
राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षा, महिला नेत्या इतर वेळी आंदोलन, उपोषण करतात. मात्र आज या गरीब कुटुंबातील मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढं का येत नाहीत हा सुद्धा स्वतः एक प्रश्नचं आहे. दरम्यान सदरील व्यक्ती एका मोट्या पक्षाचा सुद्धा पदाधिकारी आहे मग आता तो पक्ष सुद्धा त्याच्यावर काही कारवाई करणार का ? जामखेड शहरातील जेष्ठ नेते आबा, तात्या, दादा, काका, महिला नेत्या या नराधमाविरुद्ध आवाज का उठवत नाहीत. या पीडित मुलीची बाजू मग घेणार तरी कोण तिला न्याय मिळणार का ?

एक दलित कार्यकर्ता हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. उपोषणाला महाराष्ट्रातील अनेक विध्यार्थीं संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सदर घटनेची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच महिला नेत्या चित्राताई वाघ यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी पोहच केली आहे. दरम्यान आता हे प्रकरण अजून काही नवीन वळण घेतंय का ? पीडितेला न्याय मिळणार का ? अशा विकृत कृत्य करणाऱ्या नराधमांना आळा बसणार का हेच पाहणं मह्त्वाच ठरणार आहे.
