
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार
26 एप्रिल हा दिवस जामखेड साठी ऐतिहासिक दिवस व महत्त्वाचा आहे. याच दिवशी मागच्या वर्षी जामखेडचे सुपुत्र गणेश भोसले गडचिरोली येथे कर्तव्य बजावत व देश सेवा करत असताना शहीद झाले. त्या अनुषंगाने आदरांजली वाहण्यात आली आहे.शहीद जवानांच्या कुटुंबासाठी सर्व शासन प्रशासन मदतीसाठी आहे, युवकांनी,विद्यार्थी, एनसीसी कॅडेटनी शाहिद गणेश भोसले यांना स्मरणात ठेऊन त्यांची प्रेरणा घेऊन ठेवून जिद्द कष्ट मेहनत करून देशसेवेसाठी सैन्यामध्ये भरती व्हावे. सातारा-सांगली -कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक युवक सैन्यामध्ये भरती आहेत तसेच अहमदनगर जिल्ह्यात आपल्या जामखेड तालुक्याचा नंबर लागावा व दरवर्षी जामखेड मधील अनेक युवक सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवे साठी सज्ज रहावे .ही सेवा यामध्ये मरण आलेले वीरमरण आहे त्या अनुषंगाने युवकांनी सैन्यामध्ये भरती व्हावे असे आवाहन करतो व शहीद गणेश भोसले यांना आदरांजली वाहतो असे मनोगत न्यायाधीश जगताप यांनी केले

सीआरपीएफ जवान शहीद गणेश कृष्णाजी भोसले गडचिरोली येथे 26 एप्रिल 2022 रोजी कर्तव्य बजावत असताना ऑन ड्युटी शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ जामखेड मध्ये 26 एप्रिल शहीद दिनानिमित्त आदरांजली वाहून 75 मीटर तिरंगा रॅलीने मानवंदना देण्यात आली.
हे नक्की वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले
तहसीलदार योगेश चंद्रे मनोगतात यांनी सैनिक सीमेवर लढतात म्हणून आपण समाजात शांततापूर्ण वातावरणामध्ये राहतो आपण प्रत्येक क्षणाला सैनिकाचा अभिमान बाळगला पाहिजे कितीही खडतर परिस्थिती असली तरी जवान देशाचे रक्षण शहीद जवान असतील त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे असे मग व्यक्त करून वीर जवानांना आदरणीय व्यक्त केली
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी राष्ट्रधर्म पाळून राष्ट्रासाठी जगण्याची समाजासाठी जगण्याची शहीद जवान गणेश भोसले यांना स्मरून शपथ घ्यावी स्वातंत्र्य आबाधित राहण्यासाठी सैनिक कार्य करत असतात नक्षलग्रस्त भागात काही ऑपरेशन करताना अतिशय खडतर प्रशिक्षण घेऊन सैनिक कार्य करत असतात . जामखेडकरांना अभिमान वाटावा शाळेंना अभिमान वाटावा असे कार्य शहीद जवान गणेश कृष्णाजी भोसले यांनी केलेले आहे व पोलीस विभागाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो असे मनोगत व्यक्त केले.
गटविकास प्रकाश पोळ यांनी तळपत्या उन्हात कोसळत्या पावसात कडक थंडीत आपले जवान देशाचे रक्षण करीत असतात
गडचिरोली नक्षल ग्रस्त भागात दुर्गम भागात आपली सेवा देत असतात . शहीद गणेश भोसले सुपुत्र जामखेडच्या मातीत जन्माला आले याचा अभिमान वाटला पाहिजे, शहीद झालेल्या कुटुंबांना समाजाने अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे शहीद गणेश भोसले यांच्या मुलांना भविष्यात मदत लागल्यास त्याचा पाठपुरावा आम्ही करू असे मनोगत व्यक्त करून आदरांजली वाहिली
मुख्याधिकारी अजय साळवे यांनी
भोसले घराण्यांनी आपल्या घरातील एक सुपुत्र दिश सेवेसाठी दिलेला आहे ।
शाहिद गणेश भोसले यांनी अतिशय खडतर परिस्थिती असलेल्या भागात सेवा दिलेली आहे गडचिरोली भागात जवानांसाठी खडतर परिस्थिती असून त्यामध्ये सेवा असताना गणेश भोसले शहीद झाले त्यांना नगरपरिषदेच्या वतीने आदरांजली वाहतो असे मनोगत व्यक्त केले
प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी गणेश भोसले हा सर्वांचा लाडका विद्यार्थी होता
कॉलेज शिकताना सर्व शिक्षक स्टाफ चा गळ्यातील ताईत होता
प्रत्येक धर्मात मोक्ष कल्पना आहे धार्मिक पद्धतीने मोक्ष मिळवायचा असेल तर खूप कष्ट करावे लागतात परंतु मातृभूमीचे संरक्षण करताना वीरमरण आले त्याला कायमस्वरूपी मोक्ष मिळतो असे धर्म सांगतो शहीद जवान गणेश भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो,
प्रमुख उपस्थिती न्यायाधीश रजनीकांत जगताप, जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार भोसेकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर , वैद्यकीय अधिकारी सुनील बोराडे वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे, बाल विकास अधिकारी ज्योतीताई बेल्हेकर, वीर माता शोभा भोसले ,वीरपिता कृष्णाजी भोसले, प्राचार्य डोंगरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्रा मधुकर राळेभात ,राजेंद्र पवार सर,
मंगेश आजबे,जैन कॉन्फरन्सचे संजय कोठारी,जयसिंग उगले,दादा सरनोबत,सनी सदाफुले,पांडुरंग भोसले, बजरंग डोके,नगर सेवक दिगंबर चव्हाण, कॅप्टन लक्ष्मण भोरे, युवराज पाटील,विनायक राऊत,लक्ष्मण ढेपे, अमित गंभीर, पी टी गायकवाड, निलेश टेकले, मेजर मुस्तफा शेख , रावसाहेब जाधव,डॉ काशीद , कॅप्टन गौतम केळकर,अनिल देडे ,मयूर भोसले,डॉ कैलास हजारे, संदिप राळेभात,अभिजित राळेभात,मुख्याध्यापिका मीना राळेभात ,श्रीराम मुरूमकर ,डाँ.कैलास हजारे, निलेश भोसले, रमेश बोलभट, बापू जरे, प्रविण उगले,ज्ञानेश्वर कुलथे,किशोर गायवळ,नाना खंडागळे, आजी माजी सैनिक ,जामखेड शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, प्राध्यापक शिक्षक शासकीय निमशासकीय कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व प्रशासकीय सर्व विभाग प्रमुख, आजी-माजी सैनिक, शैक्षणिक संस्था,17 महाराष्ट्र बटालियन एन सी सी , सामाजिक संघटना , विविध पक्ष, ग्रामस्थ,पत्रकार, यांनी आदरांजली वाहून मानवंदना दिली,
शहीद गणेश कृष्णाजी भोसले यांच्या स्मरणार्थ 75 मीटर तिरंगा रॅलीचा प्रारंभ न्यायाधीश रजनीकांत जगताप व सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते झाला. तिरंगा रॅलीला संपूर्ण जामखेड शहरातून कडून मानवंदना दिली, शहीद जवान तुझे सलाम, गणेश भोसले अमर रहे, भारत माता की जय या घोषनेने संपूर्ण जामखेड शहर दुमदुमून निघाले व देश भक्ती वातावरण निर्माण झाले. सर्व प्रशासकीय अधिकारी ,शिक्षक प्राध्यापक, कर्मचारी ,विद्यार्थी, समस्त ग्रामस्थांनी तिरंगा रॅली उत्स्फूर्त सहभाग घेतला. तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला