महालोकवाणी न्यूज:-
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
भुतवडा येथील बाप्पू तुकाराम अडाले या शेतकऱ्याच्या रानामध्ये पाणी शिरले असून पिकांचे नुकसान होत आहे. या बाबत माहिती अशी की,भुतवडा येथील जामखेडला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज असल्याने रानात पाणी शिरले असून पिकांची नासाडी होत आहे.यातच ज्वारी काढणीला आली आहे ऐन तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यापासून हिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांनी वारंवार जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे तसेच लेखी पत्राद्वारे व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तक्रार करुन देखील प्रश्न सुटेना

प्रासंगीक विचारणा केली असता पाणी पुरवठा विभागचे अधिकारी म्हणतात की, मटेरीयल नाही असे सांगून कामचुकारपणा करीत आहे, व आमच्या प्रश्नांना दूर्लक्ष करत आहेत . हे नुकसान कसे सहन करायचे व कुणाला न्याय माघायचा असे यावेळी शेतकरी बाप्पू तुकाराम अडाले म्हणाले.

यावेळी नगर परिषदेचे प्रथम मा.नगराध्यक्ष विकास तात्या राळेभात यांच्याकडे सर्व शेतकरी मिळून या संदर्भात तक्रार केली या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा हे सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपात आंदोलन करण्यास तयार होतील तरी प्रशासनाने तत्काळ दाखल घ्यावी व त्यांचा प्रश्न त्वरित मार्गे लागावा यासाठी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार पाईपलाईन दुरुस्त करण्यास सांगितले आहे पण अद्याप अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेतलेला नाही .

भुतवडा तलावचे पाईपलाईन जर लिकेज होत असेल तर याकडे जामखेड नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देवून यासाठी प्रयत्न करावेत.याकडे दुर्लक्ष केले तर शहरात पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवू शकतो . त्यामुळे ऐन उन्ह्याळ्यात अशा अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच आज रोजी जामखेड शहराला आठ दिवसाला पाणी सोडण्यात येते. परंतु नागरिकांना पाणी पट्टी तर चुकत नाही.
