धनराज पवार;
निवारा बालगृहावर कामगार कायदा या विषयी 10 व 11 जुलै या दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.एम ट्रस्ट महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून
Adv. महारुद्र नागरगोजे यांना साधनव्यक्ती म्ह्णून नियुक्त केले होते.

असंघटीत कामगारांचे काय अधिकार आहेत,ते त्यांना कसे मिळतात,यासाठी काय करावे लागते हे फार सोप्या भाषेत उदाहरणांसह नागरगोजे वकिलांनी समजावून सांगितले.
संविधानाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून adv. अरुण जाधव,संदीप कुंभार ,बापु ओहोळ,यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.दुपारच्या सत्रात गट तयार करून त्यांना कामगारांच्या समस्या व त्यावरील उपाय या मुद्द्यांवर मांडणी करायला लावली.फार चांगल्या प्रकारे सर्वांनी यात सहभाग घेतला.
प्रास्ताविक संदीप कुंभार (जिल्हा कार्यक्रम अधिकारी aim ट्रस्ट)यांनी केले.बापू ओहोळ व किरण सूर्यवंशी यांनी aim ट्रस्टच्या कामाची माहिती सांगितली.
दुसऱ्या दिवशी adv. अरुण जाधव यांनी असंघटीत कामगारांच्या संघटना बांधण्याबाबत मार्गदर्शन केले. संघटना बांधताना आपला उददेश स्पष्ट असावा.
संविधानाने दिलेले अधिकार काय आहेत हे अगोदर प्रत्येकाला समजले पाहिजे.या साठी परिषदा,प्रबोधन मेळावे घेतले पाहिजेत.ऊसतोड कामगारांच्या मुलांना विनामूल्य शिक्षण द्यायचे काम आम्ही करत आहोत.आणि हे काम कायम करणार आहोत.संदीप कुंभार यांनी ऊसतोड कामगारांच्या व्यथा,गर्भाशयाची पिशवी काढण्यामागची कारणे सांगितली व हे थांबवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी adv. कात्रजकर,उमाताई जाधव,विशाल पवार,स्वाती ढवळे, सचिन भिंगारदिवे,नंदकुमार गाडे,तुकाराम पवार,गणपत कराळे,राजू शिंदे, अतुल ढोणे,ऋषी गायकवाड, संतोष चव्हाण,कल्याण आव्हाड,सुनील गव्हाळे,संतोष भोसले, पल्लवी शेलार,सुनीता बनकर,रोहिणी राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.34 प्रशिक्षणार्थी 8 गावातून आले होते. निवास व भोजनाची उत्तम सोय केली होती.
