जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार
दिनांक 20/07/2023 वार गुरुवार रोजी
जामखेड तालुक्यातील मोहा फाटा ( समता भुमी) येथील निवारा बालगृह येथे पै.प्रविण करडकर यांनी त्यांच्या वाढदिसानिमित्त निवारा बालगृह जामखेड येथे भेट देऊन आपला अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला.

सामाजिक बांधिलकी जपत अनाथ, निराधार, गोरगरीब मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी बालगृहातील सर्व स्टाफ व लहान लहान मूल / मुलींनी प्रविण दादा यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं

त्यांचा वाढदिवस साजरा केला या प्रसंगी प्रविण दादांच्या विचारांना मान देऊन त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी मित्र- युवा नेते मा.कृष्णा डुचे, म.पो संदीप सांगळे, महेश पवार, अनिल ठाकरे, अजय वाकळे, कांतेज समुद्र,आबासाहेब जाधव,शंकर डूचे, मंगेश पवार,अशोक डूचे, मुकेश साळवे,संदीप डूचे, संदेश पवार,महेश डोके व निवारा बालगृहातील बाळ गोपाळ इत्यादी उपस्थित होते.
