जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ,महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात वृक्षारोपणाचा उपक्रम नियोजित दि.३० जुलै २०२३, रविवारी रोजी सकाळी १०.१५ वा.ओम दत्त सन्यासी आश्रम,अहमदनगर येथील मंदिरात कार्यक्रमाची व्यवस्था केली होती.

या कार्यक्रमाचे आयोजन सौ.अनघा श्रीकांत नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी त्यांनी मंदिरात प्रसाद म्हणून स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिनकर टेमकर साहेब हे होते.
याच कार्यक्रमात श्री .दिनकर टेमकर साहेब ( माजी शिक्षण संचालक ) यांच्या हस्ते पर्यावरण मडंळाचे राज्य अध्यक्ष श्री . प्रमोद मोरे ( दादा ) यांनी जिल्हा संघटक पदाचे नियुक्ती पत्र श्रीम . कामिनी राजगुरु मॅडम यांना दिले . प्रमुख अतिथी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रमोद दादा मोरे,महाराष्ट्र राज्य सचिव वनश्रीताई ‘मोरे’ गुणवरे,ओम दत्त सन्यासी आश्रम मुख्य विश्वस्त नर्मदा चैतन्य माताजी यांची उपस्थिती होती.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद दादा यांनी पर्यावरण पूरक उपक्रम आणि पर्यावरण स्नेही यांनी एकत्र येऊन मंडळाचे काम अधिक उंचीवर कसे नेता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत राहू व संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी आपला वाढदिवस हा वृक्षारोपण करूनच साजरा करण्यात यावा असा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये बोलत असताना छायाताई राजपूत,लतिका ताई पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिनकर टेमकर साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पर्यावरणाशी निगडित वेगवेगळे उपक्रम व त्यांची अंमलबजावणी करत असताना पर्यावरणाशी जवळीक कशी साधता येईल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न केले पाहिजेत

या कार्यक्रमाला पर्यावरण प्रेमी तसेच पदाधिकारी व सदस्य म्हणून श्री.प्रमोददादा मोरे(अध्यक्ष),वनश्री मोरे/गुणवरे (सचिव),छायाताई राजपूत(कार्याध्यक्ष),प्रकाश केदारी(उपाध्यक्ष),लतिकाताई पवार(जिल्हाध्यक्षा)प्रा .बबन जाधव,ॲड सुरेश लगड,मदन राजपुत,अनघा नांदापूरकर,भानुदास शिंदे,वर्षा घुले,पद्मा राजपुत,स्नेहल कौसल्ये,कल्पना भामरे,सुप्रिया देपोलकर,श्री दादासाहेब जवरे, विजय पवार

राज्य संपर्क प्रमूख उत्तम पवार ,बाळासाहेब हारदे,अजिताताई एडके,कामिनी राजगुरू,बाळासाहेब गाडेकर, अनुराधा टण्णु, माधुरी मिसाळ, मिनाक्षी मोरे,रामेश्वर चेमटे, श्रीकांत नांदापूरकर,,राज्य प्रसिद्ध प्रमुख पत्रकार अण्णासाहेब साबळे,दत्त सन्यासी आश्रम सेवक rचांदणे हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत भोजने सर यांनी केले व आभार प्रदर्शन छायाताई बंडगर यांनी केले.
