महालोकवाणी न्यूज:
आज दिनांक 16 एप्रिल 2023 जामखेड येथे विलास साठे यांनी प्रेस घेऊन पिपल्स एजुकेशन सोसायटी, जामखेड या पन्नास वर्ष जुन्या व नामांकित शिक्षण संस्थेचा कारभार गेली बावीस वर्ष बोगस संचालक मंडळ पहात आहे. याची पोलखोल केली या शिक्षण संस्थेचे २००१ ते २०२२ पर्यंतचे सर्व पदाधिकारी बदलअर्ज मा. धर्मदाय उपायुक्त, अहमदनगर यांनी दि. २३/०९/२०२२ रोजी रद्द ठरवले आहेत. या बावीस वर्षात आपण सदर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी नाहीत हे माहित असूनदेखील दहशतीने संस्था ताब्यात ठेवून करोडो रुपयाचे व्यवहार केले आहेत.
जामखेडमध्ये शैक्षणिक भूकंप; दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे 22 वर्ष बोगस संचालक मंडळ; लवकरचं मोठा गैरव्यवहार होणार उघड ?#jamkhed #maharashtraeducation pic.twitter.com/0WtMeb8ASI
— Mahalokwani (@mahalokwani) April 16, 2023
अनेकांना नोकऱ्या लावून मोठया प्रमाणात देणगी घेतली परतू संस्थेचा एकही वार्षिक ताळेबंद सादर केला नाही. त्यामुळे या बोगस पदाधिकाऱ्यांवर आर्थिक फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा तपास व्हावा, असा तक्रार अर्ज मी मा. पोलीस अधीक्षक व उप-अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना दिला आहे. जर त्यांनी तपास करून या भ्रष्ट लोकांवर गुन्हे दाखल केले नाहीत तर याबाबत पंधरा दिवसानंतर न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
कोणतेही अधिकार नसताना धर्मदाय कार्यालयास माहिती न देता शासनाकडून व विद्यार्थ्यांकडून जमा होणाऱ्या पैशांचा गैरवापर करणे.
मनमानी पद्धतीने अनेकांना नोकऱ्या लावताना देणग्या (खंडणी) घेणे व हा पैसा संस्थेच्या ताळेबंदात न दाखवणे. एकही वर्षाचा ताळेबंद शासन निर्णयानुसार वेबसाईटवर प्रकाशित न करणे.
अधिकार नसताना नोकऱ्या लावणे, शासनास नोकरभरती प्रस्ताव पाठवणे. प्रमोशन देताना वरिष्ठांना डावलून त्यांचे बळजबरीने नकार पत्रे घेऊन कुटूंबातील व्यक्तीला मुख्याध्यापक करणे.
अधिकार नसताना नोकऱ्या लावणे, शासनास नोकरभरती प्रस्ताव पाठवणे. प्रमोशन देताना वरिष्ठांना डावलून त्यांचे बळजबरीने नकार पत्रे घेऊन कुटूंबातील व्यक्तीला मुख्याध्यापक करणे.
आपल्याच नात्यातील व्यक्ती महाविद्यालयाचा प्राचार्य करण्यासाठी पात्र प्राध्यापकावर दबाव आणून इतर कोणालाही प्राचार्य पदासाठी अर्ज दाखल करू दिले नाहीत अधिकार नसताना सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे यांची दिशाभूल करून आम्हीच संस्था चालक आहोत असे दाखवून प्रचार्याची बेकायदेशीर नियुक्ती करणे व यासाठी दोन वेळा जाहिरात काढणे.
जामखेड शहरातील एक पतसंस्थेमधून हा व्यवहार चालतो त्याचा कसलाही हिशोब नाही त्यामुळे या पतसंस्थेची चौकशी करण्याची मागणी सहकार निबंधक, अहमदनगर यांच्याकडे केली आहे.
प्राध्यापक नोकर भरतीस मा. सहसंचालक, उच्च शिक्षण यांनी स्थगिती दिली आहे व मा. संचालक या प्रकरणाची चौकशी करत आहेत परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव एकदाही सुनावणीस हजर राहत नाहीत. यांच्याकडे कागद व अधिकार नसताना यांनी सरकार, समाज व विद्यार्थी-शिक्षक यांची कोणतेच अधिकार नसताना फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल व्हावा.
वरील सर्व बाबींची चौकशी होऊन् सर्व बोगस पदाधिकारी व संचालक मंडळावर गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असे विलास सखाराम साठे प्रशांत पोपटराव लवांडे यांनी प्रेस घेऊन सांगितले आहे.
