जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
आज रोजी जामखेड शहरातील नगर रोड येथील पुढारी वडाच्या झाडाची (वटवृक्ष) पुजा बिभिषण
(मामा )धनवडे नगरसेवक तथा जामखेड शहर अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक डाँ ज्ञानेश्वर झेंडे,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, अनिल यादव ,गणेशशेठ डोंगरे,शिवकुमार डोंगरे, वैभवशेठ कार्ले,भाऊ काशिद, अर्जुन म्हेत्रे, रविंद्र कडलग, भरत राळेभात, सचिन भंडारी,बंडू ढवळे आदी उपस्थित होते.

यावे ळी बिभिषण धनवडे म्हणाले की,वर्षानुवर्ष ज्या वडाखाली तालुक्यातील सर्व राजकिय घडामोडी घडत होत्या.आमचे नेते माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात याच पुढारी वडापासून झाली. या पुढारी वडाखाली महाराष्ट्र भर असे कुणी नाही की, येथे चहा पिण्यासाठी येवून गेले, आज रोजी पुढारी वडाला अखेरचा निरोप देण्यात आला.
या पुढारी वडाशी भावनिक नाते आहे.प्रत्येक माणसाला या वडाखाली स्वतःचे हक्काचे व्यासपीठ या वडाने उपलब्ध केले.
