राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी इफ्तार पार्टी चे आयोजन – पोलीस निरीक्षक महेश पाटील
जामखेड ( प्रतिनिधी ) धनराज पवार
जामखेड पोलीस स्टेशन आयोजित पवित्र रमजान मास निमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही जामखेड तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सामाजिक सलोखा जपणे व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी या इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.

मुस्लिम समाज बांधवांसाठी अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात देशातील सर्वच मुस्लिम समाज बांधवांसाठी रमजान महिना अतिशय आनंदाचा असतो. पुर्ण महिना रोजा ( उपास) ठेवून त्यागाचे जिवन जगण्याचा प्रयत्न केला जातो.या आनंदोत्सवात सहभागी होवून त्यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मी अहोरात्र परिश्रम घेत आहे. या मध्ये मुस्लिम समाजातील सर्व घटकातील नागरीकांची गरज लागेल.राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण म्हणजे जामखेड करांनी वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड.शमा हाजी कादर शेख यांची निवड केली याबद्दल त्यांना शुभेच्छा. तसेचतुम्ही सर्वांनी मिळून सहकार्य करावे. भविष्यात जामखेड मध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात बोलताना म्हणाले की, समाजात वावरताना जी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने रहाण्याची शिकवण पैगंबरांनी दिली. त्याचे अनुकरण आयुष्यभर करावे असे संबोधले . तसेच मौलाना खलील यांनी सत्याच्या मार्गावर सतत चालत राहण्याचे आवाहन केले. इफ्तार पार्टी चे आयोजन केल्या बद्दल जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा श्री. महेश पाटील व सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समाजा तर्फे अजहर भाई काझी यांनी स्वागत केले . नगरसेवक शामीर सय्यद, कैलास हजारे, अजय काशिद, आदी मान्यवरांची भाषणे झाली.
या इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष अँड. शमा हाजी कादर शेख, मौलाना खलील , राजू भाई खान, मा. फरमान भाई नालबंद,अजहर भाई काझी, इस्माईल सय्यद, मुख्तार सय्यद ( जनता टेलर) ,राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात, भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद,हज कमिटीचे सदस्य सलीम बागवान,प्रा.लक्ष्मण ढेपे सर ,जेष्ठ नेते शेरखान भाई, नगरसेवक शामीर सय्यद, नादीर हाजी, प्रहारचे शहर अध्यक्ष नय्युम भाई सुभेदार, जाकीर शेख सर, उमर भाई कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, जमीर भाई सय्यद,डाँ कैलास हजारे, भाजपा शहर अध्यक्ष बिभीषण ( मामा ) धनवडे, शिवसेना जिल्हाउपप्रमुख सरफराज पठाण, पत्रकार लियाकत शेख, शिवाजी इकडे, आबेद खान , सामाजिक कार्यकर्ते नासीर ( चाचू ) सय्यद, वाहेद खान सरपंच पाटोदा, बिलार शेख आदी मान्यवरांबरोबरच तालुक्यातील सर्व मौलाना ,शांतता समिती सदस्य , मुस्लिम समाज सदस्य , मुस्लिम पंच कमिटी , विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी , संघटना पदाधिकारी , पत्रकार मित्र व पोलीस मित्र, व सामाजिक कार्यकर्ते व हिन्दु – मुस्लिम समाजातील बांधव बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक अविनाश ढेरे गोपनीय शाखा, व इतर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी विषेश परीश्रम घेतले.
