जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार
जामखेड मधील शिंगवी चष्माघर ठरत आहे दृष्टीहिनांसाठी दृष्टी देणारी पंढरीच ठरत आहे, असे जामखेड शहरातील कोल्हे मळा येथील शेतकरी कुटुंबातील महादेव माणिक कोल्हे यांनी हे विधान केला आहे, नुकतेच कोल्हे यांचे ऑपरेशन करण्यात आले आहे , करून ज्यांनी आपल्या स्वतःच्या दृष्टीची आशा सोडून दिली होती , पण अशा अनेक रूग्णांना दृष्टी देण्याचे कार्य शिंगवी चष्माघर करत आहे हे कौतुकास्पद आहे.

गेल्या ३८ वर्षांपासून शिंगवी प्रतिष्ठान व शिंगवी चष्माघर यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते.आत्तापर्यंत २.५ लाखांपेक्षा जास्त रुग्णांची डोळ्यांची मोफत तपासणी करून जवळपास ९२,००० रुग्णांना दृष्टी देण्याचे अनमोल कार्य शिंगवी चष्माघर ने केले आहे.

याच कार्याची दखल जामखेड तालुका, तसेच अहमदनगर जिल्हयासह उस्मानाबाद, सोलापूर व बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रुग्णांनी शिंगवी चष्माघर यांच्या आयोजित केलेल्या शिबीरामध्ये सहभागी होऊन लाभ घेतला आहे.

प्रतिक्रिया श्री.महादेव माणिक कोल्हे (रूग्ण)
आजच्या धावपळीच्या युगात पुणे, मुंबई येथे जाणे शक्य नाही, तसेच मि स्वतः डोळ्याने पिडीत झालो होतो, परंतु शिंगवी चष्माघर चे अशोकशेठ शिंगवी व त्यांचे चिरंजीव अभयशेठ शिंगवी यांनी ज्या दृष्टीहिंनाना दृष्टी दिली तसेच शिंगवी चष्माघर हे दृष्टीहिनांना दृष्टी देणारी अक्षर:श पंढरी म्हणून संबोधवावे वाटते.त्यांचे मनापासून आभार

प्रतिक्रिया (रुग्णाचे नातेवाईक )
श्री.महादेव माणिक कोल्हे यांना अनेक दवाखान्यात दाखवल पण कोणीच त्यांना दिसेल याची शाश्वती दिली नाही पण शिंगवी चष्माघर यांनी हे करून दाखविले आता त्यांनी स्पष्ट दिसत आहे.
