आज दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी जनावरांचा आठवडे बाजार सुरु करावा यासाठी कृषी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
धनराज पवार
जामखेड येथील जनावरांचा आठवडे बाजार सुरु करा ;
अ.नगर जिल्हातील राहता,लोणी,घोडेगांव आदी.जनावरे आठवडे बाजार सुरु झाले आहेत, परंतु जामखेड तालुक्यातील जनावरांचा बाजार बंद आहे , जामखेड तालुक्यात लम्पी या चर्म रोगाचे प्रमाण आता कमी झाल्याने व लसीकरण झाल्याने जनावरे बाजार ( बैल, गाय, म्हैस) इत्यादी जनावरांचा बाजार लवकरात लवकर सुरु करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. बाजार चालू करुन शेतकरी व व्यापारी यांना न्याय द्यावा. अशी मागणी या निवेदनात नमूद केली आहे.
[better-ads type=’banner’ banner=’7092′ ]
यावेळी तालुक्यातील शेतकरी व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यावेळी सभापती आणि यावेळी सांगितले की, आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत, या विषयी सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय लवकरच घेऊन , जामखेडचा जनावरांचा आठवडे बाजार सुरु करण्यात येईल, असे सांगितले

यावेळी सचिव वाहेद सय्यद, संचालक सचिन घुमरे, सुरेश पवार तसेच शेतकरी भाऊसाहेब काशिद,अविनाश मुळे,
अरविंद मुळे,शिवाजी पवार, महादेव लटपटे,तानाजी ढवळे,रविंद्र गवळी,बाळु गवळी, गोवर्धन डोळसे,रतन गाडे,कचरु पठाडे,मोहन गळगटे, गहिनीनाथ पठाडे, सद्गुरू काशिद, संभाजी काशिद, शहाजी पवार,रऊफ पठाण,हारुण पठाण,बंडू कोळेकर, सुर्यकांत मुळे, सुमंत मुळे, सदाशिव काशिद, सुरेश महाराज,बाळु घोगरदरे, मोतीराम क्षिरसागर, संदीप घोडके, रघुनाथ भवर, भाऊसाहेब सांगळे,मल्हारी कोल्हे, अशोक महारनवर, सुरेश टेकाळे,हानिफ कुरेशी, भिमराव तोंडे, हनुमंत कार्ले, आप्पासाहेब आजबे,भरत आजबे, बाबासाहेब आजबे,बाळु मंलगनेर, काकासाहेब पादरे आदी शेतकरी बांधव व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
