जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचालित, सहायक आयुक्त कार्यालय, अहमदनगर अंतर्गत, अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळेनगर, जामखेड येथे मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ रोजी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत १ एप्रिल २०२३ ते १ मे २०२३ हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत आज क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी निवासी शाळेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
