जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने जामखेड येथे रास्ता रोको(चक्काजाम) आंदोलन शनिवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (खर्डा चौक) येथे चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे
अशी माहिती धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने दिली आहे. सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे .असे आवाहन करण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील 17 ते 18% लोकसंख्या असलेला धनगर समाज मागील 70 वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचितजमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. अनेकदा अंदोलनेही झालेली आहेत प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले.पाहीजे म्हणून जाहिर भूमिका घेतात. मात्र आरक्षण अंमलबजावनी संदर्भात काहीच कृती होत नाही.

यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तरी दि. 18 ते 22 सप्टेंबर 2023 दिवसाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनुसुचितजमाती मध्ये आरक्षण अंमलबजावणीचा वटहुकुम काढला जावा व यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा. या मागणी साठी जामखेड धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने १६ सप्टेंबर 2023 वार शनिवार या दिवशी पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर चौक ( खर्डा चौक ) सकाळी ११ वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी आमच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे. तरी आमच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे व धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा.
यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन मामा गडदे,रासपाचे विकास मासाळ, किसन चिलगर मेजर,कल्याण हुलगुंडे,सुरज पवार, विजय जाधव,शाम म्हेत्रे,अल्ताब शेख आदी उपस्थित होते.
