Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे फायरबॉल गोडावून ला आग ; दोन जणांचा जागीच होरपळून मृत्य,दोन जण जखमी

जामखेड येथे फायरबॉल गोडावून ला आग ; दोन जणांचा जागीच होरपळून मृत्य,दोन जण जखमी

mahalokwaniBy mahalokwaniMay 13, 2023Updated:May 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये कामगार काम करत असताना लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे

ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे ,वय ४५ घोडेगाव.ता.जामखेड व जहीर सत्तार मूलानी ,वय ३५ रा तेरखेडा. ता कळंब आशा दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या बाबत अधिक माहिती अशी जामखेड येथील नगररोड वरील सावळेश्वर ट्रॉक्टर च्या मागिल बाजुस मालक पंकज शेळके यांचा रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटर चे उत्पादन करण्याचे (आग विझवण्याचे साधन) चे दोन वर्षापासून गोडाऊन आहे. या आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊन मध्ये आज दि १३ मे रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कामगार ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहीर सत्तार मुलानी हे दोन कामगार काम करत होते तर इतर दोघे गोडाऊन च्या बाजुला थांबलेले असताना अचानक या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यानंतर जेसीबी च्या सहाय्याने या गोडाऊनला पाठीमागून भगदाड पाडण्यात आले. या नंतर या गोडाऊन मधुन धुराचे मोठे लोळ बाहेर येत होते. तसेच आत मध्ये आसलेल्या फायरबॉल चे आगीमुळे स्फोट होत होते. या स्फोटांच्या अवाजाने आजुबाजूचे लोक धावत बाहेर आले मात्र धुराचा लोळ प्रचंड होता व अधुन मधुन होणारे स्फोट यामुळे कोणासही गोडाऊन मध्ये आत जाता आले नाही .

या घटनेनंतर जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला तातडीने बोलावण्यात आले .अग्निशामक दल व आजुबाजुला जमलेल्या नागरीकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आखेर दिड तासा नंतर आग आटोक्यात आणली. यानंतर गोडाऊन आतमध्ये जाऊन पाहीले असता या आगीत ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहीर सत्तार मुलानी आसे दोन जणांचा जाग्यावरच होरपळून मुत्यू झाला .तर इतर बाजुला आसलेल्या गणेश पवार रा.जामखेड व पुजा पठाडे वय २४ असे दोन जण जखमी झाले .

घटनेची माहिती मा. सरपंच सुनील कोठारी व संदेश कोठारी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी कोठारी यांना दिली. यानंतर संजय कोठारी तातडीने जखमींना आणण्यासाठी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले होते. त्याच बरोबर अग्नीशामक दलाचे जवान अय्याज शेख ,विजय पवार, अहमद सय्यद ,पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, अनिल भारती व
व त्यांचे सहकारी ,शंकर बोराटे, दिपक भोरे, तनवीर मुलानी, निखिल कुमकर, गोकुळ जाधव, सनी सदाफुले, बापु गायकवाड, विशाल ढवळे, सुनील मोरे सह अनेक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व त्यांच्या सहकार्‍यांनी मदत केली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार सत्यजित तांबे जामखेड येथे मतदारांच्या भेटीला; मतदारांना अभिमान वाटेल असे काम करून दाखविणार.!
Next Article कर्नाटकात कॉंग्रेसला संपूर्ण बहुमत; जामखेड ‘राष्ट्रवादी’ कडून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.