जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या पक्क्या बांधकामधारकांना,व्यापारी वर्गाला नगरपरिषदेच्या वतीने कालपासून सरसकट,मोघम नोटिसा दिल्या जात असून,पुढील चार दिवसांत आपापले बांधकाम काढून घेण्याचे त्वरीत आदेश दिले आहेत.त्यामुळे सर्व व्यापारी वर्ग हवालदिल झाले असून, त्यांच्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यापाऱ्यांच्या मते,जर डिव्हाडर,युटीलीटी एरिया कमी केला तर रस्ता नियोजनाप्रमाणेच होईल.शिवाय शहराचा कणा असलेली बाजारपेठही सुरक्षित राहिल.

वास्तविक, नगरपरिषदेच्या वतीने नोटिसा देताना नँशनल हायवेच्या सध्याच्या नॉर्मप्रमाणे 15 मी.वरील संबंधितांना नोटिसा देणे आवश्यक असतानाही,त्या रेषेवरीलही मालमत्ता धारक,सीटी सर्वेला असलेल्या नोंदी,NA जागा अशी कोणतीही खातरजमा न करता सरसकट नोटीसा देऊन कहरच केला आहे.खरेतर नगरविकास किंवा नँशनल हायवेच्या कार्यालयामार्फत अधिकृत अधिग्रहण/मोबदला याबाबत काहीही स्पष्ट केले नाही.म्हणून शासनाने यामध्ये वेळीच लक्ष द्यावे.

अन्यथा व्यापारी या अन्यायकारक नोटीसीच्या विरोधात मोठे आंदोलन,उपोषण व रास्तारोको करण्याच्या तयारीत असून,दोन दिवसांत हायकोर्टात देखील आव्हान दिले जाणार असल्याचे सांगितले.
त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, व्यापारी राजेंद्र कोठारी,आकाश बाफना, विनायक राऊत, अशोक शिंघवी,ज्ञानेश्वर शिंदे, राख साहेब, प्रमोद बोगावत,प्रदिप नहार, संजय कोठारी, सतिश पितळे,किसनराव पेचे,सोपान सोंडगे ,संतोष पवार, संतोष लोढा, अजय कोठारी, मोहन ढाळे,चिंतामणी व बहुसंख्य व्यापारी यांचा समावेश आहे.
