Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड लैंगिक अत्याचार प्रकरणी वंचित बहुजन आघाडी या दिवशी करणार उपोषण.!

जामखेड लैंगिक अत्याचार प्रकरणी वंचित बहुजन आघाडी या दिवशी करणार उपोषण.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 23, 2023Updated:May 23, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दि.०४/०५/२०२३ रोजी जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष श्री.डॉ.भास्कर मोरे यांनी एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तुरुणीचे लैंगिक शोषण करून बळजबरी केली आहे.त्या संदर्भात जामखेड पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेज मध्ये महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मुले-मुली शिक्षण घेण्यासाठी येतात.यातील अनेक मुले-मुली ही गरीब घरातील आहेत. आपल्या आयुष्यातील कमावलेली सर्व संपत्ती पणाला लावून हे पालक आपल्या मुलांना या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत असतात.

या कॉलेजच्या जवळच्या परिसरामध्ये हे मुलं-मुली निवासी राहतात.या बाहेरगावच्या मुलांना या ठिकाणी कोणाचा आधार नसतो.ही कॉलेजची सर्व मुले-मुली ही कॉलेजच्या अध्यक्ष व शिक्षक वर्गालाच आपले गुरु व पालक मानत असतात.व आपल्याला आलेल्या अडचणी त्यांना सांगत असतात.मागील काही महिन्यापूर्वी या कॉलेजमधील मुलींनी आत्महत्या केल्या आहेत.या घटना नक्की का घडतात? या घटनेमध्ये अध्यक्षांचा काही हात तर नाही ना ? तसेच अजून किती मुले आहेत की त्या लैंगिक अत्याचार होत असताना फक्त भीतीपोटी समोर येताना दिसत नाही ? या मागील काळामध्ये काही मुले-मुलींना कॉलेजची पूर्ण फी भरली असताना निकाल पत्र देताना पैशाची मागणी करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे प्रकरण याच कॉलेजवरच का घडते ? तसेच या कॉलेजचे सी.सी.टीव्ही कॅमेरे चेक का केले जात नाहीत ? शासनाने काही अटी व शर्ती नंतर या कॉलेजला मान्यता दिली असताना या अटी व शर्ती पूर्ण नसताना या कॉलेजला मान्यता मिळालीच कशी ?

असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. याकरिता दि. २२/०५/२०२३ रोजी जामखेड येथील तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौउंडेशन रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष श्री. डॉ.भास्कर मोरे यांनी 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचे लैंगिक शोषण करून बळजबरी केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून पीडित मुलीला न्याय मिळावा व जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही.तोपर्यंत रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष श्री.डॉ.भास्कर मोरे यांना जामीन मिळू नये. तसेच या संबंधित अध्यक्षांवर काठोरतील कठोर कारवाई करण्यात यावी.

अन्यथा वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने दिनांक २९/०५/२०२३ रोजी तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी उपोषण करणार अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे यांनी दिली. यावेळी उपस्थित.वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष अतिश पारवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सागर ससाने, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड शहर उपाध्यक्ष सुधीर कदम, लाला वाळके, सुरज बिरंलिगे, मोहन शिंदे, सुभाष चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते…

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहालोकवाणी न्यूजचा इम्पॅक्ट; महिला अत्याचार प्रकरणी जामखेडकर पेटले, हे राजकीय पक्ष थेट उतरले रस्त्यावर..!
Next Article जामखेड गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे जिल्हा कल्याण कार्यालयाकडून अभिनंदन .!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.